Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

संजय कपूरच्या लाडक्या लेकीने बॅकलेस टॉपमधील फोटो शेअर करत वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आणि महिप कपूर यांची मुलगी शनाया कपूरने आपल्या सौंदर्याने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. विशेष म्हणजे तिने अजूनही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. तरीही ती सोशल मीडिया स्टारही बनली आहे. त्याचबरोबर आता शनायाने एक बॅकलेस टॉपमधील फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.

खोडकर अंदाजाने जिंकले मन
शनाया कपूर अनेकदा तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करते. आता तिने एक पोस्ट शेअर केला आहे, ज्यात ती अतिशय बोल्ड स्टाईलसह बॅकलेस टॉपमध्ये एक खोडकर पोझ देताना दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने दोन व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने सांगितले की, ती एका खास व्यक्तीची वाट पाहत आहे.

कोणाची वाट पाहतेस
हे फोटो पोस्ट करत शनायाने लिहिले आहे की, ती तिची आई महीप कपूरची वाट पाहत आहे. यासह तिने अनेक इमोजींचाही समावेश केला आहे. असे वाटत आहे की, शनायाला बराच काळ तिच्या आईची वाट पाहावी लागत आहे. शनायाचे वडील संजय कपूर यांनी या फोटोला प्रतिक्रिया देत “मला विचारा,” असे लिहिले आहे.

बेडरूममधील फोटो आहे जबरदस्त
त्याचबरोबर शनायाने तिच्या बेडरूममधील काही फोटो शेअर केले होते. शनायाने तिचे फोटो शेअर करत लिहिले होते की, “काल रात्री मी माझा आवडता पीजे म्हणजेच पायजामा घातला होता, म्हणूनच हा क्षण कैद करणे आवश्यक आहे.” यावर प्रतिक्रिया देत तिची मैत्रीण अनन्याने लिहिले होते की, “हा तुमचा पीजे नाही, कृपया जगाशी खोटे बोलू नको.” दुसरीकडे नव्या नवेली नंदाने शनायाचा लिहिले होते की, “अपडेटसाठी धन्यवाद.”

लवकरच करेल पदार्पण
शनाया लवकरच करण जोहरचे प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यासाठी ती खूप तयारी करत आहे, अनेकदा जिमपासून ते डान्स क्लासपर्यंत अनेकदा स्पॉट होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्जुन रामपाल त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आणि मुलांसोबत घेतोय सुट्ट्यांचा आनंद, गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने शेअर केले फोटो

-एकदम कडक! डान्सर आर सी उपाध्यायचे ठुमके पाहून तुम्हालाही येईल सपना चौधरीची आठवण

-काय सांगता! समंथा अक्किनेनी अन् नागा चैतन्यच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा