Monday, July 15, 2024

चांगल्या संधी मिळूनही आपल्या अभिनयाची छाप न पाडता आलेला संजय सूरी सध्या अजमावतोय दिग्दर्शनात हात

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना चित्रपट जगतात चांगल्या संधी मिळूनही आपल्या अभिनयाची विशेष छाप पाडता आली नाही. यांमध्ये अभिनेते आणि निर्माते संजय सुरी (Sanjay Suri) यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश होतो. सध्या संजय सुरी संगीत क्षेत्रात काम करताना दिसत आहे. हिंदी चित्रपट जगतातील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींसोबत त्याने काम केले. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या संजय सुरी यांचे बालपण अत्यंत संघर्षात गेले. आज (६ एप्रिल,) संजय सुरी यांचा वाढदिवस, पाहूया त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल.

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे जन्मलेला अभिनेता आणि चित्रपट निर्माता संजय सुरी आज ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. संजयचा जन्म 6 एप्रिल 1971 रोजी झाला होता. आतापर्यंत तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणारा संजय सुरी आता प्रसिद्ध चित्रपट निर्माता झाला आहे. 2018 मध्ये, संजय सुरी आणि नोरा फतेही यांच्या व्हिडिओ संगीत ‘अजनबी, माय बर्थडे सॉन्ग’ खूप चर्चेत होते. काश्मीरमध्ये जन्म आणि बालपण गेल्याने संजयलाही दहशत जवळून जाणवली. दहशतवादी हल्ल्यात वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना अनेक रात्री निर्वासित छावणीत काढाव्या लागल्या होत्या.

या बालपणीच्या संघर्षमय आठवणी नेहमीच त्याच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. मॉडेल म्हणून संजय सूरीची कारकीर्द खूप यशस्वी होती, त्यानंतर त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले. संजयचा पहिला चित्रपट ‘प्यार में कभी कभी’ होता, ज्यामध्ये राजेश खन्नाची मुलगी रिंकी खन्ना आणि अभिनेता दिनो मोरिया देखील मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला असला तरी संजयने आपल्या अभिनयाने प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांना खूप प्रभावित केले होते. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.

यानंतर संजय सूरीने मागे वळून पाहिले नाही आणि ‘एक दामन’, ‘फिलहाल’, ‘दिल विल प्यार, युद्ध’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. संजयने उर्मिला मातोडकर, सुष्मिता सेन, जुही चावला यांसारख्या अनेक बड्या अभिनेत्रींसोबत अभिनय केला आहे. ‘झंकार बीट्स’ या चित्रपटात संजयची जुहीसोबतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र हा चित्रपट काही विशेष छाप पाडू शकला नाही. परंतु त्याने कधीही हार मानली नाही.

संजय सूरीने 2005 मध्ये जुही चावलासोबत ‘माय ब्रदर निखिल’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटात त्याने पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली. संजय सूरीला अभिनेता म्हणून फारसे यश मिळत नव्हते. यामुळेच तो नंतर चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत दिसू लागला. या दिशेने त्याची कारकीर्द चांगली चालली आहे, त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘आय एम’ या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा