Monday, June 9, 2025
Home टेलिव्हिजन आपल्या मुलीला आमिर अलीशी भेटून देत नाहीये संजीदा शेख, केला ‘हा’ मोठा दावा

आपल्या मुलीला आमिर अलीशी भेटून देत नाहीये संजीदा शेख, केला ‘हा’ मोठा दावा

एक काळ असा होता, जेव्हा संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) आणि आमिर अली (Aamir Ali) हे छोट्या पडद्यावरील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक होते. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. २०१९ मध्ये सरोगसीद्वारे त्यांना एक मुलगी झाली, जिचे नाव आयरा आहे. हे जोडपे ८ वर्षांपासून आनंदी वैवाहिक जीवन जगत होते. परंतु २०२० मध्ये त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांचे मन तोडले.

या वर्षी जानेवारीमध्ये आमिर अली आणि संजीदा शेख अधिकृतपणे वेगळे झाले. संजीदाला त्यांची मुलगी आयरा हिची कस्टडी मिळाली असली, तरी ती आणि आमिर त्यांच्या मुलीचे पालकत्व सांभाळणार असल्याची बातमी होती. मात्र, संजीदा आपल्या मुलीला आमिरला भेटू देत नसल्याचा खुलासा एका मीडिया हाऊसने दिलेल्या सूत्राने केला आहे. सूत्रानुसार, “संजीदा आमिरला त्यांच्या मुलीला भेटू देत नाही. आमिरला त्याच्या तीन वर्षांच्या मुलीला भेटून जवळपास नऊ महिने झाले आहेत. असे दिसते की, आमिरनेही आपल्या मुलीला भेटण्याची लढाई सोडून दिली आहे.” (sanjeeda shaikh is not letting meet her daughter to aamir ali)

आपल्या मुलीला चांगले वातावरण देऊ इच्छिते संजीदा
याबाबत संजीदा शेखला विचारले असता ती म्हणाली, “माझ्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याची लोकांना जास्त उत्सुकता वाटते. त्यामुळे मला माझे वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायला आवडते. रुमर्सना मी सांगू इच्छिते की, सिंगल पालक म्हणून मी माझ्या मुलीला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. तिला सकारात्मक वातावरण देण्यास माझे प्राधान्य आहे आणि तेच मी निवडले आहे.”

तसेच संजीदा आणि आमिर हे लोकप्रिय कपल्सपैकी एक होते. त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने सर्वानाच धक्का बसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा 

हे देखील वाचा