सध्या देशात लॉकडाऊन असल्याने सगळेजण घरातच आहेत. अशातच चित्रपटाची शूटिंगही बंद असल्याने आता सगळे कलाकार देखील घरीच बसून आहेत. यातच बॉलिवूड अभिनेत्री संजीदा शेख ही या दिवसात छोटी मुलगी आयरासोबत सगळा वेळ घालवत आहे. संजीदा ही सोशल मीडियावर तिच्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिच्या मुलीचे व्हिडिओ खूप आवडत असतात. तसेच ती तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे सर्वत्र चर्चेत आहे. संजीदाने तिच्या मुली सोबतचा एक छान व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो आता वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
संजीदा तिच्या मुलीच्या बाबतीत प्रत्येक क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने तिच्या मुलीचे मदर्स डे, ईदचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या मुली सोबतचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
संजीदाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिची मुलगी आयरा तिला किस करताना दिसत आहे. हा क्यूट व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “हम.” संजीदाचे चाहते तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिच्या मुलीचे कौतुक करत आहेत.
एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, “ब्युटिफुल” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “ओ बाबा रे बाबा, सो क्यूट मम्मा अँड बेबी.” संजीदाने हा व्हिडिओ शेअर करून काही तासच झाले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
संजीदाचा पती आमिर अली याला देखील आयरासोबत वेळ घालवायला खूप आवडतो. ते दोघेही एकत्र नाही राहत पण त्या दोघांचं आयुष्य आयरा आहे.
आमिर आणि संजीदा हे दोघेही ‘क्या दिल में है’ या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. यासोबतच या जोडीने ‘नच बलिये 2’ मध्ये सहभाग घेतला होता. त्यांनतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांनी आयराला सरोगसीद्वारे जन्म दिला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच
-सनी लिओनीने चाहत्यांना दिले ‘हे’ खतरनाक चॅलेंज, भल्या- भल्यांना फुटेल घाम घाम
-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक