Thursday, March 28, 2024

‘विक्कीच्या लग्नात कौशललाच परवानगी नाही’, म्हणत सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेने उडवली कॅटरिना विक्कीच्या लग्नाची खिल्ली

कॅटरीना कैफ(Katrina Kaif) आणि विक्की कौशल(Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्चा खूप दिवसांपासून होत आहेत. त्यांच्या लग्नाआधीचे विधी देखील सुरू झाले आहेत. ते दोघे ९ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. जरी त्यांनी लग्नबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली, तरी त्यांच्या लग्नाच्या चर्चा मीडियामध्ये, इंडस्ट्रीमध्ये आणि फॅन्समध्ये जोरदार सुरू आहेत. त्यांच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालींची माहिती, त्यांचे फोटो रोजच व्हायरल होत आहे.

याच दरम्यान कॉमेडीयन सुगंधा मिश्रा( Sugandha Mishra) आणि तिचा पती संकेत भोसले (sanket Bhosale)यांनी कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या लग्नाबद्दल चेष्टा करत एक व्हिडिओ बनवला असून, हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, दोघेही व्हिडिओमध्ये विक्की आणि कॅटरीनाच्या लग्नाविषयी बोलत असतात आणि व्हिडिओच्या शेवटी दोघांमध्ये वाद देखील होतो.

या व्हिडिओमध्ये सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले हे एका सोप्यावर बसलेले दिसत आहे. सुगंधाने काळ्या रंगाचे जॅकेट घातले असून, संकेतने कळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. सुगंधा संकेतला विचारते की, ‘कॅटरिना आणि विक्कीच्या लग्नाला जाणार का?’ यावर संकेत बोलतो की, ‘नाही जाणार.’ त्यावर सुगंधा विचारते, ‘का?’ मग संकेत म्हणतो की, ‘बोलवणार तेव्हा जाणार ना.’ संकेतचे हे बोलणे ऐकून सुगंधा जोराने हसते. सुगंधा म्हणते, ‘आपण कुठे त्यांना आपल्या लग्नाला बोलवले होते, आपल्या लग्नाच्यावेळी कोव्हिड होता म्हणून कोणाला परवानगी नव्हती.’ पुढे ती हसत म्हणते, ‘विक्की आणि कॅटरीनालाच कोणाला परवानगी द्यायची नाही.’ याच्या नंतर संकेत असे म्हणतो की, ‘दररोज नवीन नवीन बातम्या येतात की त्यांच्या लग्नामध्ये याची परवानगी नाही त्याची परवानगी नाही.’ यावर सुगंधा हसते. पुढे संकेत म्हणतो की, ‘उद्या असं नको व्हायला विक्कीच्या लग्नात कौशलला परवानगी नसेल.’ या गोष्टीवर दोघेही हसतात.

या व्हिडिओच्या शेवटी संकेत असे काही म्हणतो ज्यामुळे सुगंधा त्याच्यावरती चिडते. संकेत म्हणतो की, ‘लग्न कितीही धुमधडाक्यात करा लग्नानंतर जे होणार आहे तेच होतं.’ हे बोलत तो सोप्यावरून उठून जातो. सुगंधा या गोष्टीवरून गोंधळून जाते आणि ती संकेतच्यामागे जाते आणि विचारते, ‘तुझा बोलण्याचा अर्थ काय आहे?’ याच्यानंतर सुगंधा कॅमेरा बंद करते. तत्पूर्वी कॅटरिना आणि विक्की हे राजस्थानमध्ये ९ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार असून, त्यांचे लग्न अतिशय खासगी आणि जवळच्या लकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

हेही नक्की वाचा –

हे देखील वाचा