मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक नवनवीन प्रयोग होत आहेत. यातही ऐतिहासिक आणि हटके विषय असणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आता एक वेगळा असा विषय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. देहदान आणि त्याविषयीची जागृती करणाऱ्या ‘8 दोन 75‘ (8 Don 75) या मराठी चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटात संस्कृती बालगुडे, शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे-विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ. निखिल राजेशिर्के आणि सीमा कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वैभव जोशी यांच्या गीतांना अवधून गुप्ते यांनी संगीत दिले आहे.
टीझरमध्ये चित्रपटातील काही महत्त्वाच्या दृश्यांचा समावेश आहे. यात एक तरुण मुलगी देहदान करण्याचा निर्णय घेते आणि त्यासाठी तिच्या कुटुंबाला आणि मित्रांना समजावून सांगते. ‘8 दोन 75‘ हा चित्रपट देहदान ही एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि तिची आवश्यकता का आहे यावर प्रकाश टाकतो. टीझरमध्ये चित्रपटातील कलाकारांची उत्तम अभिनयशैली दिसून येते.
संस्कृती बालगुडेने देहदान करण्याचा निर्णय घेणाऱ्या तरुणीची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई आणि इतर सर्व कलाकारांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली प्रतिक्रिया मिळेल अशी अपेक्षा आहे.
View this post on Instagram
टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी चित्रपटाची कथा आणि संकल्पना आवडल्याचे सांगितले. काही प्रेक्षकांनी चित्रपटाच्या कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. चित्रपटात, देहदानाची प्रक्रिया कशी असते, देहदान केल्याने कोणाला फायदा होतो, याबद्दल माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देहदान ही एक मानवतावादी कृती आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. (Sanskriti Balgude 8 Don 75 Teaser Out)
आधिक वाचा-
–अभिनेता शाहरुखची पत्नी गौरीला ईडीची नोटीस; जाणून घ्या नेमक प्रकरण काय ?
–‘धूम 3’ चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण, अभिषेक बच्चनने शेअर केली पोस्ट, नेटरकरी म्हणाले…