Saturday, July 6, 2024

किल्लर लूक अन् जीवघेण्या अदा! चाहत्यांना भुरळ घालतोय संस्कृतीचा ‘रेड हॉट शॉट’

मराठमोळ्या संस्कृती बालगुडेने आजवर अनेक चित्रपटात काम केलं आहे. अवघडातली अवघड भूमिका संस्कृती अगदी सहजतेने पार पाडते. अतिशय निवडक चित्रपट आणि त्यातला उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीमध्ये एक खास स्थान मिळवले आहे. तिच्या याच अंदाजामुळे तिचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी ती दरदिवशी तिचे फोटोशूट, नाहीतर मग व्हिडिओ शेअर करते. चाहत्यांकडूनही तिच्या पोस्टला खूप प्रेम मिळतं.

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केलं आहे, ज्याचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्याला पाहायला मिळतील. या फोटोमध्ये संस्कृती कमालीची सुंदर दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री लाल रंगाचा ड्रेस घातला आहे, जो अतिशय स्टायलिश आहे. या ड्रेसमध्ये संस्कृतीचा लूक आणि अदा अक्षरशः जीवघेण्या आहेत. तिचा मेकअप आणि हेअरस्टाईल सर्वकाही अगदी उत्तम आहे. यातील तिचा लूक अगदी किल्लर आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चाहते फोटोवर प्रतिक्रिया देऊन अभिनेत्रीचे भरभरून कौतुक करत आहेत. यापूर्वीही संस्कृतीने अनेकदा आपले घायाळ करणारे फोटोशूट शेअर करून, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ती अखेरच्या वेळेस ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती ‘८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के असे कलाकार काम दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा