Tuesday, July 9, 2024

संस्कृती बालगुडेच्या जीवघेण्या अदांनी लावलं चाहत्यांना वेड; लेटेस्ट फोटोशूट इंटरनेटवर होतंय व्हायरल

मराठमोळ्या संस्कृती बालगुडेने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. अवघडातली अवघड भूमिका संस्कृती अगदी सहजतेने पार पाडते. विशेष म्हणजे, संस्कृती सगळेच चित्रपट न स्वीकारता अगदी निवडक चित्रपट करणे पसंत करते. तिच्या याच अंदाजामुळे तिचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी ती दरदिवशी तिचे फोटोशूट नाहीतर मग व्हिडिओ शेअर करते. चाहत्यांकडूनही तिच्या पोस्टला खूप प्रेम मिळते.

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर सक्रिय राहणे पसंत करते. अलीकडेच तिने एक हॉट फोटोशूट पोस्ट केलं आहे, जे सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीची जीवघेण्या अदा पाहायला मिळाल्या आहेत.

हे हॉट फोटोशूट तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. विशेष म्हणजे, हे फोटोशूट तिने पाण्यामध्ये शूट केलं आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये संस्कृतीने अतिशय हॉट पोझेस दिल्या आहेत. तिचा हा अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

यातील तिच्या अदा पाहून, कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. हे फोटो बघता बघताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीचं हे फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे. यामुळेच फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती ‘८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के असे कलाकार काम दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कलाकारांनी व्यक्त केला शोक

-‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

-‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

हे देखील वाचा