Monday, April 21, 2025
Home मराठी अभिनेता संतोष जुवेकरने उघडली अभिनयाची शाळा, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

अभिनेता संतोष जुवेकरने उघडली अभिनयाची शाळा, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar)  हा मराठी सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि डॅशिंग लूकने त्याने मोठा चाहता वर्गही निर्माण केला आहे. सध्या संतोष जुवेकर एका वेगळ्याच कारणामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. हे कारण म्हणजे अभिनेता संतोषने ठाण्यात अभिनयाचे प्रशिक्षण देणारी शाळा सुरू केली आहे. ई दृश्यम अँन्ड इंटरटेनमेंट स्कूल असे या शाळेचे नाव आहे. याबाबतची माहिती अभिनेत्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे. 

अभिनेता संतोष जुवेकरचे एक मोठे स्वप्न साकार झाले आहे. ज्याची माहिती त्याने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अभिनेता संतोष जुवेकरने मित्रांनो एक स्वप्नं होत ठाण्यात एक फिल्म असावं जिथे सामान्य घरातल्या मुलांना/मुलींना ज्यांना ह्या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे आणि शिकण्याची इच्छा आहे आणि अडमीशन फी सुद्धा परवडणारी असावी आणि उत्तम ट्रेनिंग सुद्धा मिळावी.
आणि ई दृश्यम अँन्ड इंटरटेनमेंट स्कूलच्या रूपात ते स्वप्नं तुम्हां सर्वांच्या शुभेच्छाने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने पूर्ण झालं अशी गोड माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

 

त्याचबरोबर या पोस्टमध्ये अभिनेता संतोष जुवेकरने  आणि आता त्याला NSDC (National skill Development council Goverment Recognized Training partnership आणि MESC (Media & Entertainment Skill Council) मान्यताही मिळाल्याचे सांगितले आहे. या पोस्टवर संतोष जुवेकरच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत त्याचे अभिनंदन केले आहे. दरम्यान अभिनेता संतोष जुवेकरने याआधीही शाळकरी मुलांना मदतीचे आवाहन करणारी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना या सुंदर उपक्रमाबद्दल तोंडभरुन कौतुक केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा