संतोष जुवेकर हा मराठी चित्रपट जगतातील एक स्टायलिश स्टार म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि देखण्या लूकने त्याने मराठी चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अभिनयातील जिवंतपणा आणि डॅशिंगपणा प्रत्येकालाच भावत असतो म्हणूनच संतोष जुवेकरच्या चित्रपटांचे आणि अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असते. संपोष जुवेकर जितका त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तितकाच तो साधेपणा आणि दिलदार व्यक्तीमत्वामुळेही नेहमीच चर्चेत असतो. असाच त्याचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्याच्या स्किनची ट्रीटमेंट करताना दिसत आहे.
संतोषने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात आपण पाहू शकतो की, तो त्याच्या चेहऱ्याची ट्रीटमेंट चालू आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने एक सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “खूप मेहनत घ्यावी लागते बाबा. दुकान चालू ठेवायचं असेल तर दुकानातला माल पण चकचाकीत आणि fresh असला पाहिजे. छान आणि फ्रेश दिसायला जसं उत्तम व्यायाम आणि उत्तम अहार आणि पुरेशी झोप घ्यावी लागते तसंच चेहऱ्याची योग्य काळजी घ्यायला एक उत्तम डर्माटॉलॉजिस्ट सुद्धा हवा आणि तो मला मिळालाय.” त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मी डियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण त्याच्या या व्हिडिओवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
अभिनेता संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘फक्त लढं म्हणा’, ‘मोरया’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले होते. त्याच्या या चित्रपटातील दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. या चित्रपटांनी संतोष जुवेकरची एक तगडा, देखणा तरुण अभिनेता अशीच ओळख सिनेजगतात झाली होती. संतोषने छोट्या पडद्यावरही या ‘गोजिरवाण्या घरात’, ‘असं सासरं सुरेख बाई’, ‘वादळवाट’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-़