Saturday, June 29, 2024

‘दादा तुझा हाच वेगळेपणा भावतो…’ अभिनेता संतोष जुवेकरच्या ‘त्या’ पोस्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव

संतोष जुवेकर (Santosh Juvekar)  हा मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि डॅशींग लूकमुळे तो मराठी रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. संतोष जुवेकर जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो तितकाच तो त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरताना दिसत असतो. सध्या त्याच्या अशाच एका सोशल मीडिया पोस्टची जोरदार चर्चा होताना दिसत आहे ज्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

‘मोरया’, ‘रेगे’, ‘झेंडा’ अशा एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये काम करुन संतोष जुवेकरने मराठी सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दमदार लूक, रांगडा अभिनय यामुळे संतोष जुवेकरने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. तो चित्रपटातील अभिनयामुळे तर चर्चेत असतोच त्याचसोबत त्याच्या साधेपणाचे, दिलखुलास व्यक्तीमत्वाचेही अनेक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्याचे नेटकरे तोंडभरुन कौतुक करत असताना दिसत असतात. सध्या संतोषची अशीच एक पोस्ट सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे.

अभिनेता संतोष जुवेकरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या छोट्याशा कृतीने गरजूंना कशा प्रकारे मदत करतो हे सांगितले आहे. या पोस्टमध्ये संतोष म्हणतो की, “घरच्यांना बरोबर मित्र मैत्रिणींन बरोबर बाहेर कधी नुसतं जेवायला गेलो तरी ६, ७ हजार बिल सहज येत. मग जर फक्त १० हजारात जर आपण एखाद्या मुलाचं/मुलीचं वर्षाचं अन्न नक्कीच पुरवू शकतो. वर्षातन एखादी गोव्याची trip केली तरी २० २५ हजार सहज खर्च होतात आपले. मग फक्त १५ हजारात एखाद्या मुलाचा/मुलीचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च नक्कीच करून त्या मुलाचे/ मुलीचे दत्तक पालकत्व स्वीकारू शकतो आपण. आणि हे सगळं ज्यांना मनापासून करावंसं वाटतं आणि जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांना कुठलीही अडचण नाही त्यांनी नक्कीच कराव पण मदत म्हणुन नाही तर कर्तव्य म्हणुन.आणि ही बळजबरी नाही,” असे म्हणत नेटकऱ्यांना तसेच चाहत्यांना मदतीचे आव्हान केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

 

अभिनेता संतोष जुवेकरच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली असून नेटकरी कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. या पोस्टवर अनेकांनी ‘संतोष दादा तुमचा वेगळेपणाच भावतो मनाला’ असे म्हणत जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा