Wednesday, July 3, 2024

मानलं पाहिजे! धर्मेश येलांडेने केले होते ऑडिशनमध्ये रिजेक्ट; सहा वर्षांनंतर अभिनेत्रीने त्याच स्टेजवर केले आपल्या चित्रपटाचे प्रमोशन

सान्या मल्होत्रा एक अशी अभिनेत्री आहे, जी नेहमी हटके चित्रपट करते. नुकतीच ती ‘डान्स दिवाने 3’ या डान्स रियॅलिटी शोमध्ये पोहोचली होती. या दरम्यान, सान्याने सहा वर्षांपूर्वीचा एक किस्सा शेअर केला, जेव्हा ती डान्स शोमध्ये स्पर्धक बनून आली होती.

सान्याला तत्कालीन जज धर्मेश येलांडेने डान्स शोसाठी रिजेक्ट केले होते. ‘डान्स दिवाने 3’ला धर्मेश व्यतिरिक्त माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया जज करत आहेत. या शोचा होस्ट राघव जुयाल आहे. जेव्हा सान्या तिच्या जुन्या दिवसांबद्दल सांगते असते, तेव्हा तिथे उपस्थित सर्व लोक चकित होतात.

सान्या म्हणते की, “माझ्यासाठी आयुष्य एका वर्तुळासारखे आहे. सहा वर्षांपूर्वी मी याच स्टुडिओत डान्स रियॅलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी आले होते आणि मी ऑडिशन क्लिअर करू शकले नव्हते. मला आठवत आहे की, मी एक वाजता फ्री झाले आणि माझ्या मित्राला सांगितले की मी ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाले नाही, मला घ्यायला ये, तेव्हा तुम्हीही तिथे होते धर्मेश सर. तुमच्यामुळे मी सिलेक्ट होऊ शकले नाही.” तिचे बोलणे ऐकून राघव सर्वप्रथम चकित होऊन म्हणतो, “अरे यार…”

शोचा दुसरा जज तुषार कालिया म्हणतो, “तू धन्यवाद म्हणायला हवे होते.” त्याला उत्तर म्हणून सान्या म्हणाली, “आता मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इथे आले आहे.”

धर्मेशलाही अभिनेत्रीचे हे शब्द ऐकून धक्का बसला आणि तो म्हणाला, “मला वाटते तू इथून निघून गेलीस, तेव्हा तू बर्‍याच गोष्टी घेऊन गेली की, आता मला हे करून दाखवायचंच आहे.”

धर्मेश येलांडे यानेही एक स्पर्धक म्हणूनच डान्स इंडिया डान्समध्ये भाग घेतला होता. यानंतर तो प्रसिद्ध झाला आणि आता तो बर्‍याच डान्स रिअ‍ॅलिटी शोला जज करताना दिसतो.

सान्याने 2016 मध्ये ‘दंगल’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. सान्याने तिच्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. यानंतर ती पटाखा, बधाई हो, फोटोग्राफ, शकुंतला देवी, लुडो आणि पगलेट सारख्या चित्रपटात दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’

-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा