अभिनेत्री आणि डान्सर सपना चौधरीला हरियाणाची ‘डान्सर क्वीन’ म्हणून ओळखले जाते. सपना बिग बॉस मध्ये सुद्धा सहभागी झाली होती. अलीकडेच सपनाने तिच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला, ज्यामध्ये समोर आलेल्या सपनाच्या मुलाचे नाव सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमुरशी जोडले जात आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सैफ अली खान आणि करीना कपूरला जोरदार ट्रोल केल आहे.
सपना चौधरी तिच्या डान्समुळे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. मागच्या वर्षी 4 ऑक्टोबरला सपनाने एका मुलाला जन्म दिला होता, ज्यामुळे सपना बरीच चर्चेत आली होती. सपनाने लग्न केल्याची कल्पनाच तिच्या चाहत्यांना नव्हती, ज्यामुळे चर्चाना उधाण आले होते. त्यावेळी तिचा पती वीर साहूने स्पष्टीकरण दिले होते. अलीकडेच त्यांनी मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला, ज्यामध्ये त्यांनी मुलाचे नाव सुद्धा जाहीर केले. परंतु सपनाच्या मुलाच्या नावाचा संबंध सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुरशी जोडला गेल्याने सैफिनाला मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागत आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. (Sapana Choudhary share video on sons First Bday)
सपना चौधरीने मुलाच ‘पोरस’ असे नाव ठेवले आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर तिच्या मुलाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये मुलाचे नावही सांगितले होते. ज्यामुळे नेटकरी सैफिनाला ट्रोल करत आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना “पोरस महान नाव आहे, त्यांचा आई वडिलांसाठीचा आदर वाढला आहे, ज्यांनी हे नाव ठेवले आहे,” अस एका युजरने म्हटले आहे. दुसर्या एका युजरने “काय महान नाव ठेवले आहे पोरस… नाहीतर करीनाने बघा मुलाच नाव तैमुर ठेवले आहे,” असे म्हणत करीनाची खिल्ली उडवली आहे. आणखी एका युजरने “हा मुलगा तैमुरला आव्हान देईल,” असे लिहिले आहे. तसेच दुसऱ्या एकाने “हे नाव ऐकून करीना तैमुरला युद्ध शिकवेल,” असे म्हटले आहे.
सपनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा मुलगा जमिनीवर गाईंसोबत खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये गाणे गायल्याचा मधुर आवाज येत आहे, जो तिचा पती वीर साहूचा आहे. या गाण्याचे बोल खूपच प्रभावी आहेत, ज्यात म्हंटल आहे की, “जेव्हा जेव्हा एखादा विशेष व्यक्ती या पृथ्वीवर जन्माला आला आहे, त्याने खळबळ माजवली आहे. मला विश्वास आहे तू सामान्य नाहीस, तू सामान्य घरात आहेस, पण सामान्य नाहीस. दुनियेच्या नजरा वाईट असतात म्हणून तू उजेडात नाहीस. आम्ही फक्त निमित्त आहोत तू या मातीचा पुत्र आहेस. तू अशा मातीचा वारस आहेस, ज्याने तैमुरपासून सिकंदरापर्यंत सगळ्यांवर मात केली आहे. म्हणून मी तुझे नाव पोरस ठेवतोय. वाढदिवसाच्या सार्या विश्वाला शुभेच्छा.”
दरम्यान इतिहासात तैमुर हा क्रूर शासक होता. ज्याने हिंदूंवर खूप अत्याचार केले होते आणि राजा पोरस हे पोरवांचे वंशज होते. इतिहासकारांच्या मते, पोरसांचा कालखंड इसवी सन 340 ते 315 च्या दरम्यानचा आहे. इसवी सन 326 पूर्व मध्ये पोरस आणि सिकंदर यांच्यात युद्ध झाले होते. तक्षशीलाचा राजा सिकंदरला शरण गेला होता आणि त्याने सिकंदरला पोरसवर आक्रमण करायला सांगितले होते. त्यांच्या राज्याचा विस्तार व्हावा, असा हेतू यामागे होता. परंतु पोरस राजाने सिकंदरला निकराची कडवी झुंज दिली. यामध्ये पोरस राजाचा पराभव झाला, परंतु सिकंदरचेही मोठे नुकसान झाले. सिकंदरच्या 50 हजार सैन्याशी पोरसच्या 20 हजार सैनिकांनी दोन हात केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेते अनुपम खेर यांनी हिंदू धर्माबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘हिंदू असणे हे जीवन…’
-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी
-आर्यनचे वकील मानेशिंदेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आर्यनला ‘ग्लॅमरचा तडका’ लावण्यासाठी…