‘मैं इतनी सुंदर हु , मैं क्या करू?’ असं म्हणणाऱ्या सपना चौधरीला अखेर मिळाले उत्तर


हरियाणवी डान्सर ‘सपना चौधरी’ तिच्या डान्स आणि अक्टिंगमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चचा विषय बनते. तिने तिच्या डान्सने तसेच अनेक स्टेज परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात कोणतीच कसर नाही सोडली. आजकाल तिच्या कामात खूप व्यग्र असतानाही ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करायला विसरत नाही. ती केवळ तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचं नाही तर अनेक विनोदी व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांशी जोडून राहते.

दिवसात सपनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच तिच्या या व्हिडिओवर लाखो लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

सपना चौधरीने तिच्या या व्हिडिओला‌ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये सपना प्रश्न विचारते की, “मैं इतनी सुंदर हु , मैं क्या करू?” तिच्या या प्रश्नाला अत्यंत मजेशीर उत्तर मिळाले आहे. ते उत्तर ऐकून तुम्ही देखील हसून लोटपोट व्हाल. जर तुम्ही हा व्हिडीओ पहिला नसेल तर एकदा नक्की पहा.

 

सपना चौधरी आजकाल तिच्या दोन गाण्यांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तिची बॅक टू बॅक दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ह्याच आठवड्यात तिची ‘ मिल्की’ आणि ‘बटेऊ कंजूस’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. तिच्या सगळ्या चाहत्यांना तिची ही गाणी खूपच आवडली आहेत. तसेच ती मार्चमध्ये छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तिचा क्राईम बेस्ड इन्वेस्टीगेशन हा शो अँड टीव्हीवर टेलिकास्ट होणार आहे, ज्यामध्ये ती अंकर असणार आहे.

या शोमध्ये तिच्या सोबत मनोज तिवारी आणि रवी किशन हे असणार आहेत. या शोच्या प्रोमोचा व्हिडिओ सपनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबतच तिचे ‘गुंडी’ हे गाणे देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यामध्ये ती एका वेगळ्याच अवतारात दिसणार आहे.

 


Leave A Reply

Your email address will not be published.