‘देसी क्वीन’ या नावाने प्रसिद्ध असणारी डान्सर म्हणजे सपना चौधरी. आपल्या डान्सने सगळ्यांच्या मनात ती तिची जागा निर्माण करत असते. सोबतच ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सगळ्यांशी जोडून राहते. ती तिचे बोल्ड आणि अगदी पारंपरिक फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिच्या एका फोटोमुळे ती सर्वत्र चर्चेत आहे.
सपना चौधरीने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचा लेहंगा आणि चोळी घातली आहे. या फोटोमधील तिच्या कातील अदा बघून प्रेक्षक स्वतःला या फोटोवर लाईक्स आणि कमेंट करण्यापासून थांबवू शकत नाही. या ड्रेसवर तिने निळ्या रंगाची टिकली लावली आहे. खरं तर हा रंग तिच्या ड्रेससोबत मॅच होत नाहीये. तरी देखील या टिकलीने तिच्या सौंदर्यामध्ये भर पाडली आहे. तिच्या या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत.
हा फोटो शेअर करत तिने असे लिहिले आहे की, “मला गुलाबी रंग खूप आवडतो, पण निळ्या रंगाच्या टिकलीसोबत.”
या फोटोला बघून असे वाटत आहे की, सपना कोणत्या तरी डान्ससाठी तयार झाली आहे. यावर तिने सिल्व्हर ज्वेलरी घातली आहे. तिने पायात देखील सिल्व्हर रंगाची चप्पल आणि पायात सिल्व्हर रंगाचे मोठे कडे घातले आहे. तिच्या या स्टाईलने सगळे तिच्या या लूकवर फिदा झाले आहेत.
सोबतच सपनाने आणखी एक हिरव्या रंगाच्या लेहंग्यातील फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने अत्यंत भावनिक कॅप्शन दिले आहे, तिने लिहिले आहे की, “आज माझं एवढं यश बघून सगळे हैराण झाले आहेत, पण माझी त्या मागची माझी मेहनत मात्र कोणी नाही बघितली.” सपनाने बिग बॉस 11 मध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तिच्या लोकप्रियतेने शिखर गाठले आणि तिला सर्वत्र ओळख मिळाली. शिवाय तिने अनेक गाण्यांवर डान्स करून सगळ्यांची मने जिंकली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लॉकडाऊनमुळे बॉलिवूडवर येऊ शकते मोठे संकट, कामगार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
-बापरे! ‘हिरो नंबर १’ गोविंदा सापडला मोठ्या अडचणीत, पत्नीने दिली माहिती