Tuesday, October 28, 2025
Home भोजपूरी ‘आई झाल्यानंतर सपनाचं करिअर संपलं’ म्हणणाऱ्यांची सपना चौधरीने घेतली शाळा; म्हणाली…

‘आई झाल्यानंतर सपनाचं करिअर संपलं’ म्हणणाऱ्यांची सपना चौधरीने घेतली शाळा; म्हणाली…

बिग बॉस फेम प्रसिद्ध हरियाणा डान्सर सपना चौधरी ही कायमच कोणत्याना कोणत्या कारणासाठी चर्चेचा विषय बनत असते. हरियाणाच नाही तर पूर्ण भारतात अभिनेत्रीला तिच्या डान्समुळे आणि धाडसामुळे ओळखलं जातं मात्र, काही दिवसांपसून अभिनेत्रीला तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळे सतत ट्रोलिंगचा सामना कारावा लागत आहे. आई झाल्यानंतर तिच्या करिअरवरुन सपनाला अनेकांनी ट्रोल केलं होतं मात्र, आता सपनाने देखिल ट्रोलर्सची शाळा घेतली आहे.

सपना चौधरीने (Sapna Chaudhari) बिग बॉस 12 (Bigg Boss 12) मध्ये प्रवेश केल्यांनतर अनेक गोष्टींचा खुलासा केला होता, तिच्या आयुष्यामध्ये तिने अनेक वाद आणि चढ-उतार सहन केले आहेत. सपनाने 2020 साली हरियाणवी सिंगर वीर साहू (Veer Sahu) याच्यासोबत गुपचूप लग्ना गाठ बांधली आणि 2021 साली तिने तिच्या बाळाला जन्म दिला यामुळे अभिनेत्रीला ट्रोलर्सनी निशाण्यावर धरले होते. मात्र अभिनेत्रीने नुकतचं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने ट्रोलर्सला चोख उत्तर दिलं आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओत सपना म्हणाली की, “आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते, जेव्हा आपण पडतो, उठतो, मग सावरतो, मग पुन्हा पडतो आणि पुन्हा उठतो. माझं आयुष्य पहिल्यापासून असंच राहिलंय. मी पडते, उठते, पुन्हा पडते आणि पुन्हा चालायला सुरुवात करते.”

 

View this post on Instagram

 

सपना पुढे म्हणाल की, माझं लग्न होउन मला मुल झाल्यानंतर अनेकांनी टोमणे मारले की, “तु आता काय करणार, आता ती संपली, सपनाचं करिअर संपलं असंही बोलले. पण तुम्हा सर्वांणा एक गोष्ट सांगायची आहे की, आपल्या प्रतेयकाचा जन्म हा एका आईपासूनच झालेला आहे, आई झाल्यानंतर एक स्त्री अजून ताकदवान बनते. मला जिंकायचं आहे, पडायचं आहे, पण मी पडले तरी पुन्हा उठेल पन्हा चालेल. जे कोणीही करु शकत नाही, ते मी करु शकते.”

त्याशिवाय सपनाने व्हिडिओ शेअर करत एक लक्ष वेधी कॅप्शन लिहिले की, “धीर धरा, प्रत्येकाचा चेहरा लक्षात ठेवलाय आणि प्रत्येकाची वेळ कधी ना कधी नक्कीच येईल”, तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
माणसातल्या खऱ्या माणुसकीचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता संदीप पाठकचा ‘तो’ व्हिडिओ
चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेने पोस्ट करत ‘या’ व्यक्तीला म्हटले, ‘तू फक्त माझाच…’

हे देखील वाचा