हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या स्टाईल आणि डान्सचे लाखो चाहते आहेत. चाहते तिच्या गाण्यांवर जोरदार डान्स करतात. सपनाच्या प्रत्येक अदांवर तिचे चाहते नेहमीच मरण्यासाठी तयार असतात. अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर तिने हे स्थान मिळवले आहे. आज ती तिच्या चाहत्यांमध्ये ‘हरियाणवी डान्सिंग क्वीन’ म्हणून प्रसिद्ध आहे. जर तिचे कोणतेही नवीन गाणे आले, तर चाहते गाणे ऐकण्यासाठी आणि तिच्या डान्सच्या मुव्ह्ज पाहण्यासाठी उत्सुक होतात. सपना चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. लग्नानंतर सपना पती वीर साहूसोबत सोशल मीडियावर दिसली. करवा चौथ असो किंवा वाढदिवस, तिने पतीसोबतचे फोटो शेअर करून चर्चेत राहिली. आता तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याद्वारे तिने तिचा पती वीर साहूची सकाळ कशी होते, हे सांगितले आहे.
सपना तिच्या हरियाणवी गाण्यांव्यतिरिक्त तिच्या फोटो आणि व्हिडिओंद्वारे सोशल मीडियावर खळबळ उडवून देते. अलीकडेच तिने पती वीर साहूसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पुन्हा एकदा आपल्या पतीसोबत देसी अंदाजात बोलताना दिसत आहे. काही काळापूर्वी सपनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता.
व्हिडिओमध्ये सपना चौधरी पहाटे पती वीर साहूसोबत शेतात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सपना वीरला विचारतेय, “तू काय करतोस?” उत्तर देताना वीर हो म्हणत गप्प बसतो. सपना म्हणते, “सांग तू काय करतोस?” पुढे उत्तर देताना वीर म्हणतो, “इट्स लर्निंग टाईम ऑफ सवा शेर… मी एक्सरसाइज देत आहे.” सपना म्हणते की, “कोणाची सवा शेरची की तुझी एक्सरसाइज होत आहे,” प्रतिसादात वीर “दोघांची,” असे सांगतो.
यानंतर वीर म्हणतो की, “सुंदर सकाळ, हे शेत, ही वाळू आणि सगळं… जमीनदार…” ‘सवा शेर’ हे वीर साहूच्या घोड्याचे नाव आहे, ज्यासोबत तो एक्सरसाइज करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन दिले आहे की, “ये खेत… ये रेत… ये नजारे और हम…”
सपनाच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत. चाहते इमोजीच्या माध्यमातून सपना आणि वीरच्या जोडीला प्रेम व्यक्त करत आहेत.
सपना चौधरी आणि वीर साहू हे एका मुलाचे आई-वडील आहेत. या दोघांचा मुलगा एक वर्षाचा झाला आहे. नुकतेच त्यांनी आपल्या मुलाचे नाव सांगितले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘पोरस’ ठेवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर पाहायला मिळाला उर्फी जावेदच्या बोल्डनेसचा जलवा, व्हिडिओ तुफान व्हायरल










