हरियाणाचे प्रसिद्ध डान्सर आणि गायक असणाऱ्या सपना चौधरीला कोण ओळखत नाही. पूर्वी फक्त उत्तर भारतातच प्रसिद्ध असणाऱ्या सपनाने तिच्या आवाजाने आणि तिच्या दमदार नृत्याने संपूर्ण देशात तिची ओळख निर्माण केली. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर तर तिची प्रसिद्धी आणि लोकप्रियता तुफान वाढली. नेहमी फक्त आणि फक्त आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असणारी सपना आज एका वेगळ्याच कारणांसाठी गाजत आहे.
आज ५ ऑक्टोबरला सपनाचा मुलगा त्याचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सपनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सपनाचा मुलगा दिसत असून, व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक कविता सुरु आहे. आपण पाहिले तर व्हिडिओमध्ये सपनाने तिच्या मुलाचा चेहरा जरी दाखवला नसला तरी त्याच्या बाललीला आपल्याला दिसत आहे.
या व्हिडिओच्या माध्य्मातून सपनाने तिच्या मुलाचे नाव देखील जाहीर केले आहे. सपनाच्या मुलाचे नाव आह ‘पोरस.’ व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला असणाऱ्या कवितेमध्ये कवी लिहितो, “जब- जब कोई विशेष आत्मा इस धरती पर आई है, उसने खलबली मचाई है, मुझे यकीन है तू आम नहीं है, तू आम घर में है, लेकिन तू आम नहीं है। दुनिया की नजरें बुरी हैं, इसलिए सरेआम नहीं है। हम तो एक जरिया थे, तू इस माटी का लाल है। तू उस कौम का हिस्सा है जिसने तैमूर से लेकर सिकंदर तक को थामा है, इसलिए मैं तेरा नाम ‘पोरस’ रखता हूं, तेरे जन्मदिन पर पूरे जहान को बधाई है।”
हा व्हिडिओ शेअर करताना सपनाने लिहिले, “माझ्याकडून आणि माझ्या चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा पोरस.” तिच्या या व्हिडिओला नेटकाऱ्यानी चांगलीच पसंती दिली असून, आतापर्यंत या व्हिडिओला एक लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज आले असून, हजारो कमेंट्स आल्या आहेत. सपनाचे नुकतेच प्रदर्शित झालेले ‘बनके चाली मोरनी’ हे गाणे तुफान गाजत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-किंग खानच्या लाडक्या मुलाला ऋतिक रोशनच्या एक्स पत्नीचा पाठिंबा; म्हणाली, ‘तो चांगला मुलगा आहे…’
-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन