हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉसची माजी स्पर्धक सपना चौधरीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. सपना चौधरी तिच्या धमाकेदार डान्सने सर्वांनाच वेड लावते. ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात.
आता अलीकडेच सपनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या ‘मिल्की’ या नवीन गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सपनाने पांढऱ्या आणि आकाशी रंगाचा सूट परिधान केला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या चेहर्यावरील हावभावपासून ते तिच्या डान्सपर्यंत सर्व काही खूपच पसंत केले जात आहे. एका तासात सपनाच्या या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. तसेच, हे गाणे हरियाणाचे प्रसिद्ध गायक विश्वजित चौधरी यांनी गायले आहे.
सपनाच्या इतर व्हिडिओंप्रमाणेच चाहते या व्हिडिओवरही प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. सपनाच्या या पोस्टवर बर्याच वापरकर्त्यांनी हार्टचे ईमोजी पोस्ट केले आहेत. तर बर्याच वापरकर्त्यांनी तिचे तोंडभरून कौतुक केले. यापूर्वीही सपनाने इंस्टाग्रामवर शेअर केलेले सर्व व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते.
नृत्याबरोबरच तिने तिच्या अभिनयानेही प्रेक्षकांना भारावून सोडले आहे. याशिवाय सपना देशातील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉसचा’ देखील भाग होती. सपना जरी बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकली नाही, तरी तिने प्रेक्षकांची मने मात्र जिंकली.
सध्या सपना तिच्या पतीसोबत गोव्यात सुट्टी घालवत आहे. काही दिवसांपूर्वी तिला गोवा विमानतळावर पती वीर साहूसह स्पॉट करण्यात आले होते. तिचे हे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. सपना आई बनल्यानंतर तिच्या लग्नाची बातमी समोर आली होती, ज्याने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तापसी पन्नूचं ‘आयटम साँग’ पाहिलंय का? व्यंकटेशच्या चित्रपटात दिसली होती बोल्ड रूपात, पाहा व्हिडिओ