हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सपना चौधरीने मेहनतीने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. केवळ हरियाणातच नव्हे, तर देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत तिला सर्वजण ओळखतात. कदाचित यामुळेच सोशल मीडियावरही सपनाला चांगले फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपली मते, फोटो आणि व्हिडिओ ती सतत शेअर करताना दिसते. अशातच आता तिचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
प्रेमात अपयशी झालेली मुले दारू पितात आणि कारण देतात की, आमचे हृदय तुटले आहे. परंतु अशा मुलांसाठी आता सपनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत चांगलीच भडकल्याचे दिसत आहे. ती म्हणत आहे की, “मुलींचेही हृदय तुटते, पण त्या मुलांप्रमाणे दारू पीत नाहीत. बेवड्यांनो, तुम्हाला फक्त कारण पाहिजे दारू पिण्याचे.” या मजेशीर अंदाजातील व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ही गोष्ट सत्य आहे.” सपनाच्या या व्हिडिओवर हसणाऱ्या ईमोजीचा अक्षरश: पाऊस पडत आहे. तिने या व्हिडिओमध्ये तिने वाघाची नक्षी असलेली साडी नेसली आहे. ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिची लिप्सिंगही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
याव्यतिरिक्त सपनाने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, जो भलताच व्हायरल झाला होता. त्यात सपना आपल्या घरातील फरशी पुसताना दिसली होती. यावरही चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या होत्या.
विशेष म्हणजे नुकतेच तिने फोटोशूट केलेले फोटो शेअर केले आहेत. त्यामुळेही ती चर्चेचा विषय आहे. यात तिने रंगीत साडी नेसली आहे.
यावरही चाहते कमेंट करून प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.
सपनाचे नवीन गाणे २३ मे रोजी रिलीझ होणार आहे. या गाण्याचे नाव ‘लखमीचंद की टेक’ असे आहे. हे गाणे सोमवीर कथूरवाल यांनी गायले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तूफानों से’ गाणं म्हणत कैलाश खेर, शिबानी कश्यप अन् सुदेश भोसले यांनी केला कोरोना योद्धांना सलाम