Monday, July 1, 2024

कोण आहे सपना चौधरी? इंस्पेक्टर बनण्याचे स्वप्न बघणारी सपना कशी झाली डान्सर

भोजपूरी अभिनेत्री सपना चौधरी (Sapna chaudhary) तिच्या किलर मूव्ह्समुळे नेहमीच चर्चेत असते. सपना आधीच खूप लोकप्रिय होती, पण बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सपनाचे जबरदस्त परिवर्तनही पाहायला मिळाले, पण तुम्हाला माहित आहे का सपना कोण आहे आणि ती लाखो हृदयांची धडकन कशी बनली. चला तर जाणून घेऊयात तिच्या आयुष्यातील एक रंजक किस्सा…

सपनाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, तिचे स्वप्न पोलिस अधिकारी बनण्याचे होते, पण तिने कधीच विचार केला नाही की, डान्स हेच तिचे करिअर होईल. एका घटनेनंतर सपनाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आणि तिला तिच्या मनातील इच्छा दाबून टाकावी लागली. सपना अवघ्या १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर आर्थिक चणचणीमुळे घरही गहाण ठेवावे लागले. अशा परिस्थितीत सपनाच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली आणि तिला कर्जही फेडावे लागले. यामुळेच सपनाने तिचा छंद तिचा व्यवसाय बनवला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

 

सपनाचा जन्म २५ सप्टेंबर १९९० रोजी हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील नजफगढ येथे झाला. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण रोहतकमधूनच घेतले. तिचे वडील त्यावेळी एका खाजगी कंपनीत कामाला होते. सपनाने तिचा पहिला कार्यक्रम कैथलच्या पुंद्रीमध्ये केला होता, पण त्या बदल्यात तिला काहीच मिळाले नाही. त्यानंतर तिला ३१०० रुपये मिळाले. त्यावेळी सपना ३० ते ३५ कार्यक्रम करत असे त्यामुळे ती तिच्या घरी राहायची. आता सपना एका इव्हेंटसाठी लाखात फी घेते. सपनाला तिच्या पहिल्या सॉलिड बॉडी गाण्याने जास्त लोकप्रिय केले.

सपना इतकी लोकप्रिय झाली की, तिची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर झाले. मात्र, यावेळी एका कार्यक्रमात सपनाने रागानी गायली, त्यामुळे ती वादात सापडली. सपनाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आणि एसआयटीही स्थापन करण्यात आली. सपनासाठी फेसबुकवर बरंच काही लिहिलं होतं, जे सहन न होऊन तिने विष खाल्लं. सपना वाचली असली तरी तिला बराच काळ आयसीयूमध्ये राहावे लागले. सपनाला याचा फायदा झाला की ती आणखी लोकप्रिय झाली आणि सलमान खानच्या (Salman Khan) शो बिग बॉस ११ (Bigg Boss) मध्ये पोहोचली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या रक्तातच देशभक्ती! भारतीय सैन्याशी आहे घट्ट नातं
‘भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे’, बॉयकॉट बॉलिवूडवर अक्षय कुमारने सोडले मौन
स्वातंत्र्य दिनादिवशीच ‘पिप्पा’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टिझर आला समोर, पाहा भारत पाकिस्तान युद्धाचा थरार

हे देखील वाचा