Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनयातच नव्हे, तर अभ्यासातही अव्वल आहे सारा; ‘या’ अवघड विषयात 100 टक्के मिळवत केलं होतं तिने टॉप

बॉलिवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान हिचा जन्म नवाब घराण्यात झाला आहे. मात्र तरीही तिने आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. ती आपल्या प्रत्येक चित्रपटात चांगली कामगिरी करत असते. सारा एक चांगली अभिनेत्री तर आहेच, पण ती एक सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनीही होती, हे खूप कमी लोकांना माहीत असेल. तिला मिळालेल्या गुणांबद्दल ऐकलं, तर तुम्ही देखील चकित व्हाल.

सारा अली खान (sara ali khan) ही नवाब साहेब सैफ अली खानची मोठी मुलगी आहे. चित्रपटात पदार्पण करण्याआधी ती अभ्यासात सर्वांना टक्कर देत असायची. तिने इयत्ता दहावीमध्ये टॉप केलं होतं. विशेष म्हणजे, विज्ञानसारख्या अवघड विषयात 100 गुण मिळवत तिने टॉप केलं होतं. आपल्या मेहनतीच्या जोरावरच तिला कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळाला होता.

साराने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला अभ्यासाची खुप आवड आहे. म्हणूनच तिने प्रत्येक फील्डमध्ये कोर्स केला होता आणि हे सगळं ती खुप मजेत करायची. तसेच अभिनयात तिला जो आनंद मिळतो, तो बाकी कशातच नाही. साराने पुढे सांगितले की, तिला विज्ञान विषय खूप आवडायचा आणि त्यामुळेच तिने केमिस्ट्री, फिजिक्स व बायोलॉजीमध्ये 100 टक्के मिळवत टॉप केलं होतं. या विषयांचा अभ्यास करता करता ती इतिहासाचा सुद्धा अभ्यास करायची व ती इतिहासकार सुद्धा होती.

अभिनेत्री सारा अली खान हिने 2018 मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सारासोबत दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतने काम केले होते. त्यानंतर तिने अभिनेता रणवीर सिंगसोबत ‘सिंबा’ या चित्रपटात काम केले. तसेच साराने सुपरहिट चित्रपट ‘कुली नंबर. 1’ या चित्रपटात सुद्धा काम केले आहे. आता लवकरच सारा दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अंतरंगी रे’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. (sara ali khan also topped in studies got 100 marks in this subject)

अधिक वाचा- 
बापाच्या पैशांवर जगणाऱ्या मुलींमधली नाही सारा; वर्षाकाठी छापते ‘एवढे’ कोटी, एका सिनेमासाठी घेते ३ कोटी
अनन्याचा साडीतील लूक पाहून तुमचे होश उडतील; पाहा फोटो

हे देखील वाचा