बॉलिवूड जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा स्टाईलमुळेच जास्तीत जास्त चर्चेत येत असतात. या अभिनेत्रींच्या कपड्यांची, त्यांच्या स्टाईलची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा रंगलेली असते. या अभिनेत्रींच्या स्टाईलचे कधी कौतुक होते. तर कधी त्यांच्या विचित्र स्टाईलमुळे या अभिनेत्रींना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. सध्या अभिनेत्री सारा अली खानलाही (Sara Ali Khan) अशाच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
सारा अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्डनेसने तिने सिने जगतात स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारा अली खान तिच्या अभिनयाइतकीच लूकसाठी आणि बोल्डनेससाठीही सिनेसृष्टीत विशेष प्रसिद्ध आहे. साराचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सारा अली खानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे तिला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
या व्हायरल फोटोंमध्ये साराने खूपच छोटा टॉप आणि शॉर्ट घातला आहे. साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. अनेकांनी तिला छोटे कपडे घातल्याबद्दल खडेबोल सुणावले आहेत. तर काही जणांनी तिच्यावर टिका करताना तिच्या शॉर्टपेक्षा खिसे मोठे आहेत असे म्हणत तिची जोरदार खिल्ली उडवली आहे.
दरम्यान सारा अली खानने अतरंगी रे, जुडवा २, केदारनाथ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले होते. या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक केले होते.
हेही वाचा – रुपाली भोसलेचा मराठमोळा लूक
श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या दिग्दर्शकावर लागला पेमेंट न देण्याचा आरोप; म्हणाले, ‘हे सगळं खोटं आहे’
मुलगा पाहिजे की मुलगी? बिपाशा बासूने स्पष्टचं सांगितले