सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी मुलगी सारा अली खान ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सारा तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी नेहमीच नवीन आणि मनोरंजक पोस्ट्स शेअर करते, यांना जिच्या चाहत्यांकडून खूप प्रेमही मिळते. अनेकदा तिच्या सुंदरतेचं दर्शन घडवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
नुकतेच साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिची सोज्वळ निरागसता पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये सारा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यावेळी ती कधी बोटमध्ये बसून, तर कधी नदीच्या किनारी फोटोसाठी पोझ देत आहे. अगदी साधा लूक असूनही सारा यात कमालीची सुंदर दिसत आहे. (sara ali khan looking stunning in white dress see latest post)
हे फोटो शेअर करून तिने कॅप्शनमध्ये व्हाईट हार्ट ईमोजीही बनवले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांमध्ये खूप पसंत केले जात आहेत. या फोटोवर आतापर्यंत ५ लाख ४४ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. शिवाय चाहते कमेंट बॉक्समध्ये अभिनेत्रीच्या कौतुकाचे पूल बांधत आहेत.
साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटापासून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. यात ती दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतसोबत दिसली होती. त्यानंतर ती उल्लेखनीय कामगिरी करत, बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवताना दिसत आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सारा लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहेत. सोशल मीडियावर चित्रपटासंबंधित बरेच फोटो समोर आले आहेत. ज्यातून हे येते की, चित्रपटाविषयी सारा खूपच उत्सुक आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत
-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा
-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा