Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड करण जोहरच्या ‘त्या’ खुलाश्यावर रागावली सारा अली खान, वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणाली…

करण जोहरच्या ‘त्या’ खुलाश्यावर रागावली सारा अली खान, वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणाली…

करण जोहर (Karan Johar) त्याच्या मोस्ट अवेटेड शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनसह परतला आहे. पहिल्या एपिसोडमध्ये, रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) पोहोचले, जिथे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे करणने नुकतेच उघड केले. सारा आणि कार्तिकने या प्रकरणावर आतापर्यंत मौन बाळगले होते, मात्र करणच्या या खुलाशानंतर सारा त्याच्यावर नाराज आहे.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन त्यांच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. मात्र आजतागायत दोघांनीही याची पुष्टी केलेली नाही. दोघे इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’मध्ये एकत्र दिसले होते. नुकताच करण जोहरने त्यांच्या नात्याचा खुलासा केला आहे. (sara ali khan not happy with karan johar for talking about her relationship)

‘यामुळे’ नाराज आहे सारा
एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, करणने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सार्वजनिकपणे बोलल्याने सारा खूश नाही. कारण तिची इच्छा आहे की, चाहत्यांनी फक्त तिच्या करिअरच्या आलेखावर लक्ष केंद्रित करावे. कारण ती तिच्या कामातून तिची ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिच्या आयुष्याविषयीची ही वैयक्तिक माहिती तिच्या चाहत्यांचे लक्ष विचलित करू शकते आणि तिला तसे करायचे नाही.

करणशी बोलेल की नाही सारा?
अहवालात पुढे म्हटले आहे की, सारा करणशी कधीच बोलणार नाही किंवा ती खूप नाराज आहे, असे काही नाही. पण हो, लोक आता ज्या प्रकारे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फुशारकी मारत आहेत, ते तिला आवडत नाही. सूत्राने सांगितले की, ती एक समर्पित अभिनेत्री आहे आणि चाहत्यांनी फक्त तिच्या चित्रपटांबद्दल आणि तिच्या अभिनयाबद्दल बोलावे अशी तिची इच्छा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा