बॉलिवूडमधील पार्ट्या नेहमीच चर्चेत असतात. अनेकवेळा कलाकार एकमेकांच्या घरी डिनर आणि लंचसाठी जात असतात. अशातच पतौडी परिवाराची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान तिच्या वाढदिवसाच्या आधी तिची आई अमृता सिंगसोबत प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या घरी गेली. जिथे त्यांनी सोबत डिनर देखील केले. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.
सारा अली खान ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडून राहत असते. नुकतेच ती तिची आई अमृता सिंगसोबत डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या घरी गेली. तिथे त्यांनी एकत्र जेवण करत, गप्पा देखील मारल्या. त्यांच्या या डिनरची आणि गप्पा गोष्टींची झलक तिने सोशल मीडियावर दिली आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत स्टाईलिस्ट अमी पटेल देखील उपस्थित होती. (sara ali khan reached manish malhotra house with mother amrita singh says thank you after delicious dinner)
साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये सारा. अमृता, मनीष मल्होत्रा आणि अमी पटेल दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अनेक जेवणाचे पदार्थ दिसत आहेत. हे फोटो साराने मनीष मल्होत्रा याला टॅग करून लिहिले आहे की, “ही संध्याकाळ खास बनवण्यासाठी आणि एवढ्या स्वादिष्ट जेवणासाठी धन्यवाद.” नुकतेच काही दिवसापूर्वी साराने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती दिल्ली, बिहार, गोवा, वैष्णोदेवी, जयपूर आणि इतर अनेक ठिकाणांची झलक तिने दाखवली होती.
सारा लवकरच वूटचा शो ‘फिट अप विद द स्टार्स’च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. यामध्ये ती सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या नात्यावर बोलताना दिसणार आहे. तिने सांगितले की, त्यांचा वेगळे होण्याचा निर्णय अगदी बरोबर होता, कारण ते एकमेकांसोबत खुश नव्हते. त्यांच्या घटस्फोटानंतर ती तिच्या आईकडे राहत आहे. तसेच तिने सांगितले की, तिची आई तिची बेस्टफ्रेंड आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…