Saturday, July 6, 2024

काय सांगता! कार्तिक आर्यननंतर आता ‘या’ साऊथ अभिनेत्याला डेट करू इच्छिते सारा अली खान

नुकताच करण जोहरचा (Karan Johar) चॅट शो ‘कॉफी विथ करण सीझन ७’चा प्रीमियर झाला. पहिल्या एपिसोडमध्ये   (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) आले होते. आता या आठवड्यात बॉलिवूडच्या दोन बेस्ट फ्रेंड्स सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) करणच्या शोमध्ये दिसणार आहेत. या एपिसोडचा ट्रेलर करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये करण जान्हवी आणि सारासोबत मस्ती करताना दिसत आहे.

ट्रेलरमध्ये, करण जोहर सारा अली खानला एका मुलाचे नाव विचारतो, ज्याला तिला सध्या डेट करायचे आहे. सुरुवातीला ती सर्व उत्तरे देण्यास नकार देते. मात्र नंतर ती अभिनेता विजय देवराकोंडा (Vijay Devarkonda) याचे नाव घेते. (sara ali khan reveals she wants to date vijay deverkonda)

जान्हवीला आवडतो का विजय?
सारा विजयचे नाव घेते तेव्हा जान्हवी हसायला लागते. त्यानंतर करण तिला म्हणतो की, ‘तुला अनेकदा विजयसोबत स्पॉट केले जाते.’ यानंतर सारा तिला विचारते की, तिला विजय आवडतो का?

एक्सबद्दल ‘असे’ बोलली सारा
करणने साराला तिच्या एक्सबद्दल काहीतरी सांगण्यास सांगितले. यावर सारा म्हणते, ‘तो सर्वांचा एक्स आहे.’ करणने अलीकडेच सारा अली खान आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) एकमेकांना डेट केल्याचा खुलासा केला होता.

‘कॉफी विथ करण’चा हा भाग १४ जुलै रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या एपिसोडमध्ये सारा आणि जान्हवी अनेक खुलासे करताना दिसणार आहेत.

हे देखील वाचा