कलाकार चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट शेअर करतात. अशात सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खान देखील सोशल मीडियावर तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चाहत्यांची मने घायाळ करत असते.
साराने नुकतेच तिचे नवीन अंदाजामधील हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती सूर्य किरणांचा आनंद घेत असल्याचे दिसते. तसेच या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा एक शर्ट घातला आहे. या शर्टाची बटणे तिने उघडी ठेवली आहेत. तसेच तिने काळ्या रंगाचे इनर घातलेले आहे. यामधील तिचा हॉट अंदाज चाहत्यांना खूप आवडला. तसेच मेसी हेअरमुळे तिचे रूप अधिकच खुलून आले आहे. अनेकांनी तिला यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. काहींनी हार्ट ईमोजी, तर काहींनी फायर ईमोजी पोस्ट केले आहेत. (Sara Ali Khan shared the sun kissed pohoto opened shirt button photo vairal on social media)
तिच्या फोटोंप्रमाणेच तिचे कॅप्शन देखील हटके असते. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, “इक बेवफा के जख्मों पर, मरहम लगाने हम गए. मरहम की कसम, मरहम न लगा.” ही शायरी लिहिली. यामध्ये मरहमच्या जागी मर हम लिहायचे होते. चूक दुरुस्त करत तिने हे कॅप्शन बदलले आणि त्या जागी फायर ईमोजी ठेवले.
काही दिवसांपूर्वीच तिने साडीमधील फोटो शेअर केले होते. यामध्ये देखील ती खूप सुंदर दिसत होती. तिने नेसलेल्या साडीवर ‘मेरे पास मॉं है’ असे लिहिले होते. अभिनेत्री नुकतीच तिच्या सुट्ट्या एन्जॉय करताना देखील दिसली होती. ती मालदीव आणि काश्मीरला फिरायला गेली होती.
साराच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती ‘अतरंगी रे’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि धनुष तिच्यासह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’