Tuesday, July 9, 2024

प्रॅंकच्या नावाखाली सारा अली खानने केलं ‘असं’ काही, सोशल मीडियावर व्यक्त केला जातोय संताप

अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh) आणि सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. साराकडे अनेक कौशल्ये असली, तरी तिच्यामध्ये असे एक खास कौशल्य आहे, जे प्रत्येकाकडे असावे. ती अनेकदा तिच्या मस्तीखोर अंदाजाने सगळ्यांना हसवते. पण यावेळी तिची मस्ती तिलाच महागात पडली. अलीकडेच सारा अली खानने तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट प्रँकबद्दल सांगितले, ज्यामुळे आता ती ट्रोल होत आहे.

बॉलिवूड कलाकार त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते रोज त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. सारानेही तिच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये तिने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

चाहत्याने विचारला ‘हा’ प्रश्न
यादरम्यान एका चाहत्याने साराला तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट प्रँकबद्दल विचारले. उत्तरात साराने तिच्या स्पॉट गर्लसोबत मस्ती करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा स्पॉट गर्लला स्विमिंग पूलमध्ये ढकलून, तिची मजा घेताना दिसत आहे.

Photo Courtesy: Instagram/saraalikhan95

झाली ट्रोलिंगची शिकार
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आधी सारा स्पॉट गर्लसोबत फोटो क्लिक करते आणि नंतर अचानक तिला स्विमिंग पूलमध्ये ढकलते. हे पाहून स्पॉट गर्लही हैराण होते. या व्हिडिओमध्ये साराने बिकिनी घातली आहे. साराची ही मजा तिच्या चाहत्यांना आवडली नाही आणि नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले. एका युजरने लिहिले की, “सारा हा विनोद नाही, याला उद्धटपणा म्हणतात.” दुसर्‍याने लिहिले, “सारा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.” हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर युजर्स सारावर चांगलेच संतापले आहेत.

विकी कौशलसोबत दिसणार अभिनेत्री
सारा शेवटची ‘अतरंगी रे’ चित्रपटात धनुष आणि अक्षय कुमार सोबत दिसली होती. या चित्रपटातील साराच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. आता सारा विकी कौशलसोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा