Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सारा अली खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर! आगामी चित्रपटात ‘या’ महिला स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारणार अभिनेत्री

बॉलिवूडची तरुण आणि प्रतिभावान अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) तिच्या पुढील चित्रपटासाठी करण जोहरसोबत हातमिळवणी केली आहे. सारा ए वतन,मेरे वतन’ या देशभक्तीपर चित्रपटाचा भाग बनण्यास तयार असल्याचे वृत्त आहे. यामध्ये ती स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांची भूमिका साकारणार आहे. साराच्या या नव्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाबद्दल आता तिच्या चाहत्यांना जोरदार उत्सुकता लागली आहे. 

सारा अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच सारा एका महिला क्रांतिकारकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट या वर्षी सप्टेंबरमध्ये फ्लोरवर जाईल. साराने या वर्षाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट साइन केला होता. तिने तिच्या इतर सर्व कमिटमेंट्स पूर्ण केल्या आहेत. आता ती तिचे पूर्ण लक्ष या चित्रपटावर केंद्रित करू शकते.

साराने आधीच या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे आणि ती पहिल्यांदाच खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखा साकारण्यास उत्सुक आहे. हा चित्रपट प्रामुख्याने उषा मेहता यांनी ‘काँग्रेस रेडिओ’ नावाने सुरू केलेल्या भूमिगत रेडिओ स्टेशनवर आधारित असेल, जो 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही महिने कार्यरत होता. ‘काँग्रेस रेडिओ’ने स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, कारण ते सेन्सॉर न केलेल्या बातम्या आणि भारताच्या ब्रिटिश सरकारने बंदी घातलेल्या इतर माहितीचे प्रसारण करत होते.

सारा अली खानचा ए वतन,मेरे वतन’ हा चित्रपट कन्नन अय्यर दिग्दर्शित करणार असून करण जोहर निर्मित करणार आहे. कन्नन अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्येही काम करणार होते. आता ‘ए वतन, मेरे वतन’मध्ये व्यस्त आहे. फिल्ममेकर केतन मेहता देखील उषा मेहता यांच्या बायोपिकवर काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा –

‘तो महिलांना मारहाण करणारा मनोरुग्ण’, सलमान खानवर दिग्गज अभिनेत्रीचे खळबळजनक आरोप

राजू श्रीवास्तव यांच्या लेकीने १२ व्या वर्षी केलायं भिम पराक्रम, राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला शौर्य पुरस्कार

बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आहेत एकमेकांचे कट्टर दुश्मन, वादाची कारणे वाचून व्हाल थक्क

हे देखील वाचा