सारा अली खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कमालीची चर्चेत असते. सारा नेहमीच तिच्या विविध ठिकाणांच्या उपस्थितीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. सरळ फिरण्याची खूपच हौस आहे. सारा सतत तिच्या फावल्या वेळात कुटुंबासोबत, मैत्रमैत्रिणींसोबत फिरताना दिसते. या फिरण्याच्या अनेक पोस्ट तिच्या व्हायरल देखील होतात. आता देखील सारा तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेली आहे. या ट्रिपचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून, ते व्हायरल झाले आहे. मात्र यातल्या एका फोटोमुळे मोठ्या चर्चाना उधाण आले आहे.
View this post on Instagram
सारा अली खानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एक फोटोमध्ये ती स्विमिंगपूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. या फोटोत तिच्यासोबत एक मुलगा दिसत असल्यामुळे हा मुलगा नक्की कोण? असे प्रश्न आता विचारले जर आहे. सारासोबत दिसत असलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साराचा मित्र लेखक जेहन हांडा आहे. दोघंही पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.
सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच गॅसलाइट मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसी आणि चित्रांगदा सिंग दिसणार आहे. याशिवाय ती ‘ऐ वतन मेरे वतन’ मध्ये देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एका व्यक्तीच्या बोलण्यामुळे आपला आत्मविश्वास गमावून बसला होता “हा” विनोदी अभिनेता
पोन्नियिन सेलवन २ सिनेमातील ‘या’ गाण्याला घेऊन वाद, ए आर रहमान यांच्यावर गाणे चोरल्याचा मोठा आरोप