बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीचा एक वेगळाच स्वॅग असतो, एक वेगळी स्टाईल असते. त्यांच्या याच वेगळ्यापणामुळे त्यांची इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण होत असते. यातीलच तिच्या स्टाईलने आणि अंदाजाने सर्वांना तिच्याकडे आकर्षित करणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. तिच्या वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडिओने ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतेच तिने काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. ज्यांची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे.
साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने केशरी रंगाची बिकिनी घातलेली आहे. त्यावर तिने एक जॅकेट घातले आहे. या फोटोमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन देखील दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “डोळे त्या गोष्टी सांगतात, ज्या गोष्टी सांगायला ओठ घाबरतात. त्यामुळे तुम्ही दुसरीकडे पाहिलेले चांगले होईल.” तिच्या या फोटोला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या फोटोला आतापर्यंत पाच लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. (sara ali khan’s bikini photo viral on social media )
तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तिचे चाहते सातत्याने कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. तिच्या फोटोवर तिचे चाहते हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करत आहेत.
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने नुकतेच आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. या चित्रपटात सारा अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुषसोबत दिसणार आहे. तसेच आदित्य धर यांच्या ‘द: इम्मोर्टल ऑफ अश्वत्थामा’ या चित्रपटात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे. तसेच तिने ‘कुली नंबर 1’, ‘सिंबा’, ‘केदारनाथ’, ‘लव्ह आज कल’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बिकिनी परिधान करून ज्यूस काढताना दिसली जान्हवी कपूर; मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट
-जेव्हा गाणे गाताना अचानक ओरडली मिताली, पाहुन सिद्धार्थही झाला स्तब्ध; मग पुढे…