Tuesday, July 9, 2024

सारा अली खानचा होळीच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आजकाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असताना दिसते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्याशी जोडून राहत असते. नुकताच सारा अली खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती प्रेक्षकांना वेगळ्या अंदाजात होळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सारा अली खान या व्हिडिओमध्ये गुलाल उडवत प्रेक्षकांना ‘हॅप्पी होली’ म्हणत आहे. या व्हिडिओमध्ये साराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिचा हा व्हिडिओ बघून सगळेजण तिच्या व्हिडिओला खूपच पसंती दर्शवत आहे. तसेच तिच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत 3 लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहे. या व्हिडिओमध्ये ती रंग खेळताना दिसत आहे.

साराच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडूनही भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले की, “हॅप्पी होली. काळजी घे आणि सुरक्षित राहा.” दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, “हॅप्पी होली डिअर क्रश.” याव्यतिरिक्त आणखी एका चाहत्याने लिहिले की, “अप्रतिम.”

साराच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिचा ‘कुली नंबर -1’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सारा अली खान ही वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. या व्यतिरिक्त ती लवकरच ‘अतरंगी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुशांतच्या गोड आठवणी! होळीदरम्यानचा थ्रोबॅक व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा