Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

सुपरहिट अशा ‘साराभाई वर्सेस साराभाई’चा येणार तिसरा सिझन? अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी केला खुलासा

टेलिव्हिजनविश्वातील तुफान गाजलेला आणि आजही सगळ्यांच्या स्मरणात असलेला कॉमेडी शो म्हणजे ‘साराभाई वर्सेस साराभाई’. या शोने खऱ्या अर्थाने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. आजही हा शो विविध माध्यमांमधून लोकं बघताना दिसतात. या शोमधील प्रत्येक कलाकाराने त्यांची एक छाप लोकांच्या मनावर कोरली. कंजूस मोनिशा, हाय क्लास माया आदी अनेक कलाकार आजही लोकांच्या घरचाच हिस्सा आहे. या शोच्या तिसऱ्या पर्वाबद्दल काही बातम्या येत होत्या. त्याबद्दल आता अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी खुलासा केला आहे.

‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेमध्ये माया साराभाई ही भूमिका साकारणाऱ्या रत्ना पाठक शाह यांना या शोने अमाप लोकप्रियता मिळवून दिली. आजही त्यांना पाहिले की लोकांना माया साराभाई आदी आठवते. शिवाय त्यांच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये या शोबद्दल त्यांना विचारणा होतेच. टेलिव्हिजन विश्वातील सरावात लोकप्रिय सासू म्हणून त्यांनी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मधून ओळख मिळवली. या शोचे आधी दोन पर्व आले होते. दोन्ही सिझनला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. आता सर्वच प्रेक्षक या शोच्या तिसऱ्या पर्वाची वाट बघत आहे. मात्र नुकतेच रत्ना पाठक शाह यांनी या शोच्या तिसऱ्या पर्वाबद्दल येणाऱ्या बातम्यांना अफवा सांगत अजूनतरी असे काहीच नसल्याचे सांगितले आहे.

एका मुलाखती दरम्यान रत्ना पाठक शाह यांनी याबद्दल खुलासा केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या, “‘साराभाई वर्सेस साराभाई’ या शोच्या तिसऱ्या पर्वाची अजून प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते. कारण या शोमध्ये काम करणारे सर्वच कलाकार त्यांच्या विविध प्रोजेक्टसमध्ये व्यस्त आहे. ते एवढे व्यस्त आहे की मी त्यांना फोनवर देखील नमस्ते म्हणू शकत नाही. रुपाली गांगुली जिने मोनिशा सिंग साराभाई ही भूमिका साकारली होती, ती सध्या तिच्या सुपरहिट अशा ‘अनुपमा’शो मध्ये व्यस्त आहे. तर साहिर साराभाईनी भूमिका साकारणारा सुमित राघवन,’ वागले की दुनिया’मध्ये व्यस्त आहे.”

दरम्यान प्रेक्षकांसोबतच कलाकरांना देखील या शोच्या तिसऱ्या पर्वाची आस आहे. याबद्दल अनेकदा विविध पद्धतीने त्यांनी इच्छा दर्शवली आहे. लवकरच तो दिवस येवो आणि हा शो नवीन स्वरूपात चालू होवो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझी आई मारत होती, बाबा ओरडत होते…’, वर्ल्डकपमध्ये कपडे काढल्याच्या वक्तव्यावर पूनम पांडेने उघडले गुपित

अभिनेता आकाश कुंभारचे ‘गडद अंधार’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण

हे देखील वाचा