Saturday, June 14, 2025
Home बॉलीवूड अक्षय कुमारच्या ‘या’ मोठ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार सरगुन मेहता, चाहते तर आनंदाने मारतील उड्या

अक्षय कुमारच्या ‘या’ मोठ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार सरगुन मेहता, चाहते तर आनंदाने मारतील उड्या

पंजाबी चित्रपट अभिनेत्री सरगुन मेहता (Sargun Mehta) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, ती अभिनेता अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा ती बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. याआधीही तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले असून, अनेक म्युझिक अल्बम आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारच्या ‘मिशन सिंड्रेला’ चित्रपटासाठी सरगुन मेहताला अप्रोच करण्यात आले आहे. खिलाडी कुमारसोबत काम करताना ती आनंदी आणि नर्व्हस दोन्ही आहे. तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलताना ती म्हणाली, ती तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी योग्य संधीची वाट पाहत होती, कारण योग्य भूमिका असणे खूप महत्वाचे आहे. (sargun mehta bollywood debut with akshay kumar mission cinderella)

रणजीत एम तिवारी अक्षय कुमरच्या ‘मिशन सिंड्रेला’चे दिग्दर्शन करत आहेत. अक्षय कुमार व्यतिरिक्त या प्रोजेक्टमध्ये रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) देखील दिसणार आहे. नुकत्याच बातम्या आल्या की, हा चित्रपट थिएटर ऐवजी ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. मात्र, निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

सरगुन मेहताची गाणी आणि टीव्ही मालिका
सरगुन मेहताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. तिने ‘गीता का धर्मयुद्ध’पासून ते ‘फुलवा’पर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय पंजाबी चित्रपटांमध्येही तिचे नाव आहे. ‘किस्मत’, ‘लारे’, ‘तितलियॉं’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांमध्ये ती दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा