टेलिव्हिजन अभिनेत्री सरगुन मेहता (Sargun Mehta) क्वचितच पडद्यावर दिसते. मात्र ती सतत अनेक गाण्यांच्या अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सरगुन मेहताने छोट्या पडद्यापासून ते पंजाबी चित्रपटांपर्यंत खूप मोठा पल्ला गाठला आहे. काही दिवसांपूर्वी ‘तितलीयॉं’ हे गाणे रिलीझ झाले होते. हे गाणे चाहत्यांना खूप आवडले आणि चाहत्यांमध्ये ते खूप गाजले. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या आगामी पंजाबी चित्रपटासह प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.
‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
सरगुन मेहताने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती दिली आहे. तिने पोस्ट शेअर करत सांगितले की, त्यांचा ‘सोहेरिया दा पिंड आ गया’ हा चित्रपट २९ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेत्रीचा हा पंजाबी भाषेतील चित्रपट असेल. सरगुनने चित्रपटाची एक छोटीशी क्लिप शेअर केली आहे. तिच्या या नवीन चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक दिसत आहेत आणि पोस्टवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. (sargun mehta film sohreyan da pind aa gaya releasing on 29 july 2022)
सरगुन मेहताचा हा चित्रपट अंबरदीप यांनी लिहिला आहे आणि क्षितिज चौधरी दिग्दर्शित आहे. क्षितीज हा पंजाबी दिग्दर्शक आहे, जो ‘गोलमाल’, ‘दिलदार’, ‘मिस्टर आणि मिसेस ४२०’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखला जातो. सरगुनच्या ‘सोहरिया दा पिंड आ गया’ या चित्रपटाची रिलीझ डेट ऐकून चाहतेही त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सरगुनही प्रसिद्ध अभिनेचा रवी दुबेची पत्नी आहे. रवी आणि सरगुन दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांच्यातील नाते हे फार घट्ट आहे. आपण एकमेकांना समजू शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लग्नगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साल २०१५मध्ये त्यांनी विवाह केला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










