Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड सरिता माधवनने लिहिले, ‘बायको नेहमीच बरोबर असते’, यावर माधवन म्हणतो, ‘नक्कीच मात्र …’

सरिता माधवनने लिहिले, ‘बायको नेहमीच बरोबर असते’, यावर माधवन म्हणतो, ‘नक्कीच मात्र …’

 

सोशल मीडियावर अनेकदा कलाकारांची एक वेगळीच बाजू पाहायला मिळते. सामान्यतः कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या आगामी प्रोजेक्टसबद्दल, फोटोशूटबद्दल एकूणच काय तर त्यांच्या कामाबद्दल जास्त माहिती ते फॅन्ससोबत शेअर करत असतात. मात्र कधीकधी हेच कलाकार त्यांची एक मजेशीर दुसरी बाजू देखील सोशल मीडियावर दाखवतात. मजेशीर पोस्ट, कमेंट्स मधून त्यांची ही विनोदी बाजू सर्वाना दिसते.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधील यशस्वी आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जाणारा आर. माधवन देखील सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. नेहमी तो त्याचे सोशल मीडिया अपडेट करताना दिसतो. आता देखील तो त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेच चर्चेत आला आहे.

झाले असे की, माधवची पत्नी असलेल्या सरिता माधवनने तिचा आणि माधवनचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो चर्चेचा कारण नाहीये, कारण आहे फोटोला दिलेले कॅप्शन. सरिताने योर्टवरचा तिचा आणि माधवनचा एक छान फोटो पोस्ट आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिले, “लग्न तेव्हाच होते जेव्हा एक व्यक्ती बरोबर असते आणि दुसरी व्यक्ती नवरा असते.” तिचा हा फोटो कॅप्शन चांगलेच गाजत असताना. यावर माधवनने देखील त्याच्या स्टाइलमध्ये उत्तर दिले आहे. या कमेंटवर तो म्हणतो, “मी सहमत आहे, मग भलेही तुम्ही तिच्या उजव्या बाजूला असले तरी.”

सध्या हा फोटो आणि या दोन कमेंट्स सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहे. फॅन्स देखील यावर त्यांचे मत मांडत आहेत. या फोटोमध्ये सरिताने ब्लॅक टॉप घातला असून सोबत रेड आणि ब्लॅक रंगाची चेकर्ड पँट घातली आहे. तर माधवनने निळ्या रंगाचा टीशर्ट आणि डेनिम घातली आहे.

सरिता आणि माधवन यांच्या लग्नाला २२ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांनी १९९९ साली लग्न केले असून, २००५ साली त्यांना वेदांत नावाचा मुलगा झाला.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

हे देखील वाचा