Saturday, December 7, 2024
Home टेलिव्हिजन बहिणीला सासरी पाठवताना अभिनेता झाला भावूक; दीपिकालाही अश्रू अनावर

बहिणीला सासरी पाठवताना अभिनेता झाला भावूक; दीपिकालाही अश्रू अनावर

बहीण आणि भावाचे कितीही वाद असते परंतु ज्यावेळी बहिणीचं लग्न व्हायची वेळ येते तेव्हा मात्र भाऊरायाला अश्रू थांबवता येत नाहीत. ससुराल सिमर का फेम शोएब इब्राहिम याची बहीण सबा हिचे लग्न थाटामाटात पार पडले. यावेळी लाडक्या बहिणीला हळद लागण्यापासून तिच्या हाती मेहंदी लागेपर्यंत आणि तिची पाठवणी होईपर्यंत दीपिकाच्या पतीला अश्रू थांबवताच येत नव्हते. सर्वजण शोएब आणि त्याची पत्नी दीपिका कक्करचे कौतुक करत आहेत. त्याला उत्तम भाऊ आणि वहिनी म्हटले जात आहे. बहिणीच्या निरोपावर शोएब आणि दीपिका खूपच भावूक झाले होते. सध्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

शोएबने त्याच्या बहीण सबा हिचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरे केले. तो त्याच्या इन्स्टाग्रामवर प्रत्येक सोहळ्याची झलक देत होता. सोमवारी त्यांनी एक भावनिक फोटो पोस्ट केला. यामध्ये शोएब आपल्या बहिणीच्या कपाळाचे किस घेताना दिसत आहे. त्याची बहीण खूपच भावूक दिसत आहे. शोएबने या फोटोला कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. त्याला लोकांकडून अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, जगातील सर्वोत्तम भाऊ. आणखी एक लिहिले की, ‘ही भावना व्यक्त करणे फार कठीण आहे.’ काही लोकांनी दीपिका कक्करचे कौतुक करत तिला बेस्ट वहिनीही म्हटले आहे. एकाने लिहिले आहे की, भाऊ, वहिनींनी अम्मी, अब्बू यांच्याचे कर्तव्य पार पाडले आहे.

 

View this post on Instagram

 

 व्हिडिओने मला भावूक केले
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शोएब आणि दीपिका आपल्या बहिणीची पाठवणी केली. यानंतर कारचा एक सीन दाखवला आहे ज्यामध्ये सबा तिचे अश्रू पुसते. शोएब त्याला खिडकीच्या बाहेरून पकडून ठेवलेला दिसत आहे. अभिनेता शोएब इब्राहिम यांच्या लाडक्या सबाचा निकाह नुकताच पार पडला. लहान मुलीप्रमाणं जपलेल्या सबाला आपल्यापासून दुरावताना पाहून शोएबला हे दु:ख सहन झालं नाही आणि तिच्या लग्नाच्याच दिवशी तो कोलमडला.

याआधी शोएबचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो दीपिकासोबत स्टेजवर होता. तो त्याच्या बहिणीसोबत नाचत होता. त्याने आपल्या बहिणीच्या लग्नाच्या अनेक झलक इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘दोन मुलांचा बाप असं पुरुषांना का म्हणत नाही?’; ट्रोलर्सना उर्वशीने दिलं सडेतोड उत्तर

सलमानसोबत ‘या’ भारतीय महिला बॉक्सरने रोमँटिक गाणं केलं रिक्रिएटच; म्हणाली,’स्वप्न पूर्ण…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा