Wednesday, July 3, 2024

“फोनवर तिचा आवाज ऐकला की हृदय तुटतं” म्हणत सतीश कौशिक झाले आजारी मुलीच्या आठवणीत भावुक

बॉलिवूडमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे आणि बॉलिवूडमधील अनेक स्टार कोरोनाला बळी पडले आहेत. काही कलाकार कोरोना संक्रमणापासून मुक्त झाले आहेत, तर बरेच कलाकार अद्याप संक्रमित आहेत. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक यांनादेखील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, परंतु त्यांची 8 वर्षांची मुलगी वंशिका अजूनही रुग्णालयात दाखल आहे. सतीश कौशिकची मुलगी गेल्या 5 दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे.

मुलगी रुग्णालयात दाखल झाल्याने पाहून सतीश यांना खूप त्रास होत आहे. ते म्हणाले, “तुम्ही लोक तिच्यासाठी प्रार्थना करा.” खरं तर, 64 वर्षीय सतीश कौशिक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, त्यांची मुलगी वंशिकालाही कोरोनाची लक्षणे आढळून आली आणि त्यानंतर तिलाही रुग्णालयात दाखल करावे लागले.

यावर बोलताना सतीश कौशिक म्हणाले की, “माझी तब्येत सुधारत आहे आणि काही दिवसांसाठी मी घरीच क्वारंटाईन राहील.” सतीश कौशिक पुढे म्हणाले, “माझी मुलगी वंशिका गेल्या पाच दिवसांपासून रूग्णालयात दाखल आहे. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु तापमान सामान्य नाही, ते स्थिर आहे. तिच्यासाठी प्रार्थना करा.” यानंतर ते कोव्हिडच्या अनिश्चिततेबद्दल बोलले.

सतीश कौशिक म्हणाले, “ही एक समस्या आहे. कोव्हिडबद्दल काहीही निश्चित नाही. वाईट गोष्ट अशी आहे की, माझ्या मुलीचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु ती अजूनही आजारी आहे. तिचा ताप 100 आणि 101 वरच आहे. तिचा फोनवर रडण्याचा आवाज ऐकल्यावर माझे हृदय तुटते. या कठीण काळात देव सर्व मुलांचे रक्षण करो.”

बॉलिवूडमधील अनेक कलाकार अद्याप कोरोना संक्रमित आहेत. आमिर खान, आर माधवन, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख यांच्यासारख्या कलाकार अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्याच वेळी, बरेच कलाकार आहेत ज्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु खबरदारी म्हणून त्यांनी स्वत: ला क्वारंटाईन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’

-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा