बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतीश कौशिक यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्याचवेळी नीना गुप्ता यांनी एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करून सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
नीना गुप्ताने (Neena Gupta) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्या म्हणतात की, ‘मित्रांनो आज माझी सकाळची सुरुवात एका वाईट बातमीने झाली. या जगात एकच माणूस होता जो मला नॅन्सी म्हणायचे आणि मी त्याला कौशिकन म्हणायचे. आम्ही बराच काळ एकत्र होतो. दिल्लीत कॉलेजच्या दिवसांपासून…,’
नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, ‘हे खूप वाईट झाले. त्याची लहान मुलगी वंशिका. त्याची पत्नी शशी…त्यांच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे आणि जर त्यांना कशाचीही गरज असेल तर मी सदैव त्यांच्यापाठीशी आहे आणि मी आहे. देव त्यांना हिम्मत देवो. विशेषत: वंशिकाला आणखी काय सांगू…’
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत नीना गुप्ता यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गुड बाय कौशिकन’. कमेंट सेक्शनमध्ये चाहते सतीश कौशिक यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
सतीशने नीनाला लग्नाची ऑफर दिली होती
सतीश कौशिक (Actor Satish Kaushik) आणि नीना गुप्ता हे दोघे खूप जुने मित्र आहेत हे फार कमी लोकांना माहीत आहे. नीना गुप्ता यांनी त्यांच्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात खुलासा केला आहे की, जेव्हा त्या क्रिकेटर विवियन रिचर्डच्या मुलाची आई होणार होत्या, तेव्हा सतीश कौशिक यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती. सतीश नीना यांना म्हणाले, ‘मुलाचा जन्म झाला आणि तो सावळा जरी असला तर काळजी करू नकोस, ते अपत्य माझे आहे असे सांग आणि मग आपण लग्न करू. कुणाला शंकाही येणार नाही’. (satish-kaushik-death-he-propose-neena-gupta-for-marriage-when-she-is-pregnant-richard-vivian)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतिश कौशिक अर्थात विनोदाचा राजा! त्यांचे ‘हे’ चित्रपट पाहिल्यावर तोंडावर हसू येणार नाही, असं शक्यच नाही….
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर