Friday, July 5, 2024

कधी गोविंदा तर कधी अक्षयसोबत केलीय स्क्रीन शेअर, सतीश कौशिकचे ‘हे’ चित्रपट पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट!

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर आता यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. 

सतीश कौशिक (Satish Kaushik)  चित्रपटांमध्ये सहकलाकार आणि कॉमेडियनची भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांची गणना बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. पात्र गंभीर असो किंवा कॉमिक, सतीश कौशिक आपल्या अभिनयाने त्यात जीवंतपणा आणतात. १९८३ मध्ये आलेल्या ‘मौसम’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या सतीश कौशिक यांनी आतापर्यंत अनेक अप्रतिम चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या दमदार चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या अशा पाच चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यातील त्यांची कॉमेडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Satish Kaushik (@satishkaushik2178)

साजन चले ससुराल
गोविंदा (Govinda) अभिनित हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटात सतीश कौशिक मठ स्वामीच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात ते गोविंदाच्या मित्राच्या भूमिकेत होते. त्यांना या चित्रपटात पाहून हसून हसून प्रेक्षकांची वाईट अवस्था झाली होती. या विनोदी चित्रपटात त्यांचा दक्षिण भारतीय उच्चार चांगलाच गाजला. हा चित्रपट त्या काळातील हिट चित्रपटांपैकी एक आहे. (know about satish kaushik top 5 comedy films on his birthday)

मिस्टर अँड मिसेस खिलाडी
डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’ हा चित्रपट १९९७ मधील रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात सतीश कौशिक यांनी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) मामाची भूमिका साकारली होती. ते यात भविष्यवाणी करतात की, अक्षयच्या कुंडलीत राज योग आहे. ज्यामुळे त्याला कठोर परिश्रम करण्यापासून परावृत्त करावे लागेल. सतीशच्या अजब चालीमुळे अक्षय कुमारच्या आयुष्यात असे भूकंप आले की, ते पाहून प्रेक्षकांना हसू आवरले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Satish Kaushik (@satishkaushik2178)

हसीना मान जायेगी
संजय दत्त (Sanjay Dutt) आणि गोविंदा यांच्या या कॉमेडी चित्रपटात सतीश कौशिक कुंज बिहारीच्या भूमिकेत दिसले होते. यामध्ये कादर खानच्या (Kadar Khan) पर्सनल असिस्टंटची भूमिका करून त्यांनी प्रेक्षकांना लोटपोट केले.

दीवाना मस्ताना
गोविंदा, अनिल कपूर (Anil Kapoor) आणि जुही चावला (Juhi Chawla) यांचा या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात सतीश यांनी पप्पू पेजरची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सतीश कौशिक यांनी या व्यक्तिरेखेसाठी एक पूर्णपणे वेगळा अंदाज शोधून काढला आणि त्यांच्या याच शैलीने प्रेक्षक लोटपोट झाले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर
‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण 

हे देखील वाचा