Friday, July 5, 2024

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर कुटुंबियांची झाली अशी अवस्था; खुद्द पुतण्यानेच दिली माहिती

अनुभवी अभिनेते सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना धक्का बसला आहे. त्याचवेळी दिवंगत अभिनेत्याच्या पुतण्याने खुलासा केला आहे की, सतीशच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या आयुष्यावर काय  परिणाम झाला आहे. 

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish kaushik) यांचे ९ मार्च रोजी निधन झाले. 66 वर्षीय सतीश हे दिल्लीमध्ये होळीच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी त्यांचे जवळचे मित्र अभिनेते अनुपम खेर यांनी दिली होती. सतीश कौशिक यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईत आणण्यात आले. येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, सतीश कौशिक यांना मुखाग्नी देणारे त्यांचे पुतणे निशांत कुटुंबाबद्दल आणि सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका यांच्याबद्दल बोलले.

शी बोलताना, सतीश कौशिकचा पुतण्या निशांतने खुलासा केला की दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबाचे जीवन ठप्प झाले आहे. त्यांची पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका अभिनेत्याचे निधन झाल्याचे मान्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो असेही म्हणाला की वंशिका पाहुण्यांसमोर काहीच बोलत नाही पण एकटी असताना तिला अस्वस्थ वाटू लागते. अभिनेते सतीश यांच्या अस्थी हरिद्वारमध्ये विसर्जित केल्या गेल्या. त्यांच्या पुतण्यांनी विधी केल्याचा खुलासाही निशांत यांनी केला.

निशांतने सतीश कौशिक यांचे ‘चांगले’ वडील म्हणून त्यांचे वर्णन केले. त्यांनी खुलासा केला की, ते त्यांच्या मुलीसोबत खूप खेळ खेळायचे. दरम्यान, वंशिकाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या वडिलांसोबतचा आनंदी फोटो पोस्ट केला आहे होता. मात्र सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांनी त्यांचे हँडल डिएक्टिवेट केले.

सतीश कौशिक यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक सेलेब्रिटी अभिनेत्याला निरोप देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले होते. सलमान खान, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, जावेद अख्तर, फरहान अख्तर, शहनाज गिल, रझा मुराद, राकेश रोशन यांच्यासह सर्व सेलिब्रिटींनी सतीश कौशिक यांना निरोप देताना डोळे पाणावले होते.

दिवंगत अभिनेते यांनी अलीकडेच सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामधील त्यांची भूमिका असलेला भागाचे शूटिंग केले होते आणि ते चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होते. त्यांचे अनेक प्रोजेक्ट्स येणार होते. (satish-kaushik-death-latest-update-wife-and-daughter-condition-his-nephew-revel)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं….,’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सून शिवानी रांगोळे हिला मजेशीर सल्ला
2 वर्षात 100 ट्यून बनवल्या, पण 9 च सिलेक्ट झाल्या; चित्रपटातील गाणी आणि नृत्याने रचला इतिहास

हे देखील वाचा