Friday, November 22, 2024
Home अन्य पीएम मोदी ते सीएम शिंदे, सतीश कौशिक यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का, अधिवेशनाच्या धामधुमीतही शिंदेनी लिहिला भावूक संदेश

पीएम मोदी ते सीएम शिंदे, सतीश कौशिक यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का, अधिवेशनाच्या धामधुमीतही शिंदेनी लिहिला भावूक संदेश

अभिनेते सतीश कौशिक यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे बॉलिवूडसोबतच सामान्य लोकं देखील धक्क्यात आहेत. हृदय विकाराच्या तीव्र धक्याने गुडगाव येथे त्यांचे निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी होळी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. सतिश यांनी हिंदी सिनेसृष्टीत जवळपास ३० वर्ष काम केले. ‘मौसम’ सिनेमातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. ते एक उत्कृष्ट अभिनेते तर होतेच शिवाय ते दिग्दर्शकही होते. आपल्या कॉमेडीने त्यांनी लाखो लोकांची मने जिंकली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे सतीश कौशीक आज सगळ्यांना रडवून निघून गेले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ते आता या जगात नाही यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांसोबतच राजकारणातील लोकांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर ट्विट करताना लिहिले, “सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार सतिश कौशिक यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे मी खूप दुखी आहे. ते एक प्रतिभावान कलाकार होते. त्यांनी त्यांच्या अद्भुत अभिनय आणि दिग्दर्शनाने सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचे काम त्यांच्यानंतरही प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहील. त्यांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना ओम शांती.”

तर गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक सतिश कौशिक यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मोठे दुःख झाले. भारतीय सिनेमा, कलात्मक चित्रपटांसाठी त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. माझी त्यांच्या परिवारासोबत संवेदना ओम शांती.”

तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी लिहिले, “आपल्या सर्वांगसुंदर अभिनय, दिग्दर्शन, निर्मितीच्या माध्यमातून हिंदी चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी मन विषण्ण करणारी आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे… भावपूर्ण श्रद्धांजली.”

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले, “मग तो मिस्टर इंडिया मधील ‘कॅलेंडर’ असो, दिवाना मस्ताना मधील ‘पप्पू पेजर’ असो त्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवले आणि त्यांचे मनोरंजन केले. त्यांच्या निधनामुळे दुखी आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.”

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी लिहिले, “प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक असलेल्या सतिश कौशिक यांच्या निधनामुळे दुखी आहे. त्यांच्या निघून जाण्यामुळे सिनेसृष्टीची मोठी क्षती झाली आहे. प्रभू श्रीराम त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ओम शांती.”

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी लिहिले, “अभिनेते आणि दिग्दर्शक सतिश कौशिक यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच मोठे दुःख झाले. ते भारतीय सिनेमाचे प्रतीक होते. त्यांनी त्यांच्या असाधारण प्रतिभेने सिनेसृष्टीत मोठे योगदान दिले यासाठी त्यांना कायम आठवले जाईल. ओम शांती.”

केंद्रीय मंत्री असलेल्या अनुराग ठाकूर यांनी लिहिले, “श्री सतिश कौशिक एक प्रशंसित अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी त्यांच्या चित्रपटांनी आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. विनोदी कलाकार म्हणून त्यांनी सर्वाना भरभरून हसवले. ओम शांती.”

 

 

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आजारी असलेल्या सुलोचना दीदींच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड, बॉलिवूडवर शोककळा

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा