बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. सतीश यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक उत्तम दिग्दर्शक, अभिनेते असलेल्या सतिश यांनी एक विनोदी अभिनेता म्हणून मोठी ओळख कमावली होती. त्यांचे व्यावसायिक आयुष्य तर नेहमीच चर्चेत होते मात्र वैयक्तिक आयुष्य देखील एकदा लाइमलाईट्मधे आले होते, जेव्हा त्यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांना लग्नाची मागणी घातली होती.
बॉलिवूडचे उत्कृष्ट अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकार आणि कॉमेडियनची भूमिका साकारणारे सतीश कौशिक हे बॉलिवूडचे सशक्त अभिनेते मानले जातात. पात्र गंभीर असो वा कॉमिक, प्रत्येक भूमिकेत सतीश कौशिक आपल्या अभिनयाने जीव ओतून घेतात. त्यांनी १९८३ मध्ये मौसम या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक व्यक्तिरेखा साकारल्या. यासोबतच सतीश कौशिक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. ज्यामध्ये त्यांनी नीना गुप्ताला (Neeta Gupta) घातलेली लग्नाची मागणी चांगलीच चर्चेत आली होती. काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊ.
View this post on Instagram
गेल्या वर्षी नीना गुप्ता यांचे ‘सच कहूं तो’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. अभिनेत्रीने स्वतःबद्दलच्या अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. या पुस्तकात नीनाने सांगितले आहे की, “त्यांची मुलगी मसाबा पोटात असताना अभिनेता सतीश कौशिकने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. सतीशला मसाबासाठी वडिलांची जबाबदारी घ्यायची होती. सतीश कौशिक यांनी नीना गुप्ता यांना सांगितले होते, काळजी करू नको, जर मूल काळ्या वर्णाचे असेल तर सांगा की ते माझे आहे आणि आम्ही लग्न करू. कोणाला काही शंका येणार नाही.” तत्पुर्वी मसाबा गुप्ता ही वेस्ट इंडिजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची मुलगी आहे. दोघांचे अफेअर होते, पण त्यांनी लग्न केले नाही. नीनाने एकटीने मुलगी मसाबाला वाढवले आहे.
यानंतर सतीश कौशिक यांनी नीना गुप्ताच्या या खुलाशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “मी नीनाचे कौतुक करतो, लग्नाशिवाय अशा प्रकारे मूल वाढवले. मला तिच्यासोबत खरा मित्र म्हणून उभे राहायचे होते. नीनाने आपल्या पुस्तकात जे काही लिहिले आहे, ते मत व्यक्त केल्याच्या स्वरूपात लिहिले आहे. खऱ्या मित्राप्रमाणे मला तिच्या पाठीशी उभे राहायचे होते. मला तिला आत्मविश्वास द्यायचा होता. मला त्या काळात तिला एकटेपणाची जाणीव करून द्यायची नव्हती, शेवटी फक्त मित्रच जे योग्य आहे त्यासाठी उभे राहतात. जेव्हा मी नीनाला लग्नासाठी प्रपोज केले, तेव्हा माझ्या मनात खूप संमिश्र भावना होत्या. जेव्हा तिला एखाद्या व्यक्तीची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा मी त्याला सांगितले की मी आहे, तू काळजी का करतोस? त्यावेळी नीना खूप भावूक झाल्या होत्या.”
दरम्यान सतीश कौशिक आणि नीना गुप्ता १९७५ पासून मित्र आहेत. जेव्हा नीना मसाबासाठा गरोदर होत्या, तेव्हा सतीश आणि नीनाचे बाँडिंग खूप घट्ट होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर
‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण