Friday, July 5, 2024

जेसीबीच्या मदतीने खड्ड्यातून हत्तीची सुटका, ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी केला व्हिडिओ शेअर

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह हे इतर कलाकारांप्रमाणेच सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. या लॉकडाऊन दरम्यान अनेक कलाकारांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. घरी असले तरी ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. अशातच सतीश शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका हत्तीचा जीव वाचवताना दिसत आहेत.

सतीश शाह यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ कर्नाटकचा असून या व्हिडिओमध्ये एका हत्तीचा जीव वाचवला जात असल्याचे दिसत आहे. एक हत्ती खड्ड्यात पडला आहे. ज्याला जेसीबीच्या मदतीने वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तो हत्ती वर येण्याचा प्रयत्न करत होता. पण तो खाली घसरत होता. शेवटी त्याला वर काढण्यात यश आले. त्यावेळी सतीश शाहही तिथे उपस्थित होते.

त्यांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. सगळेजण कमेंट करून त्यांनी केलेल्या त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. त्यांचे प्राणी प्रेम बघून सर्वजण त्याचे खूपच कौतुक करत आहेत.

सतीश शाह यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात विनोदी पात्र निभावले आहे. यामध्ये ‘जाने भी दो यारो’, ‘यह जो है जिंदगी’, ‘साराभाई vs साराभाई’, ‘मैं हू ना’, ‘कल हो ना हो’, ‘फना’, ‘ओम शांती ओम’, ‘घर जमाई’, ‘पुरानी हवेली’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, ‘खड तैनू मैं दस्सा’ गाण्यावरील नेहा कक्करचे एक्सप्रेशन्स पाहून युजरची कमेंट

-तूफानों से’ गाणं म्हणत कैलाश खेर, शिबानी कश्यप अन् सुदेश भोसले यांनी केला कोरोना योद्धांना सलाम

-‘मास्क लावायचे ज्ञान देत होती, आता..’, हर्षाली मल्होत्राचे बीचवरील फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा