अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या प्रत्येक गाण्याची तिचे चाहते आतुरतेने वाट बघत असतात. अशातच तिचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. तिचे ‘सत्यमेव जयते २’ मधील ‘कुसु कुसु’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे या चित्रपटातील एक आयटम साँग आहे. ज्यामध्ये नोरा खूप सुंदर पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स पाहून कोणीही तिच्यावर फिदा होईल.
कदाचित नोरा फतेही दिग्दर्शक मिलाप जवेरीसाठी लकी असावी, कारण ‘दिलबर’ आणि ‘एक तो कम जिंदगानी’ या गाण्यानंतर हे त्यांच्यासोबत नोराचे तिसरे गाणे आहे. हे गाणे जारा खान आणि देव नेगी यांनी गायले आहे. तसेच हे गाणे तनिष्क बागची यांनी लिहिले आहे आणि संगीत दिले आहे. (Satyamev Jayate 2 nora fatehi song kusu kusu released )
या गाण्यावर नोराने अत्यंत सुंदर पद्धतीने डान्स केला आहे. या गाण्यात जॉन अब्राहमची खास झलक देखील पाहायला मिळत आहे. या डान्सचे कोरिओग्राफर आदिल शेख आहे. या गाण्यात ती बेली डान्स करताना दिसत आहे.
या गाण्याबाबत बोलताना नोराने सांगितले की, “सत्यमेव जयते या चित्रपटाचे माझ्या आयुष्यात एक खास स्थान आहे. त्यामुळे ‘सत्यमेव जयते २’ मध्ये माझा सहभाग असल्याने मला खूप आनंद होत आहे. दिलबर गाण्याच्या यशानंतर दिलरुबासोबत परत येणे माझ्यासाठी खूप खास आहे. मी मिलाप, निखिल आणि भूषण सर यांचे आभार मानते की, त्यांनी मला पुन्हा एकदा संधी देऊन काहीतरी वेगळे निवडले. मी ‘कुसु कुसु’ गाण्याबाबत खूप उत्सुक आहे. मी सगळ्याच्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे.”
जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार यांच्या ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, मोनीशा आडवाणी, मधू भोजवानी निखिल आडवाणी यांनी केले आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-