Sunday, February 8, 2026
Home बॉलीवूड डाकूनं गोरी मॅडमला उचलून नेलं,- धुरंधर’मध्ये भाभीजीला पाहताच हप्पू सिंगने शेअर केली मजेदार प्रतिक्रिया

डाकूनं गोरी मॅडमला उचलून नेलं,- धुरंधर’मध्ये भाभीजीला पाहताच हप्पू सिंगने शेअर केली मजेदार प्रतिक्रिया

दिग्दर्शक आदित्य धर यांचा बहुचर्चित ‘धुरंधर’ चित्रपट सध्या प्रेक्षकांना अक्षरशः आनंदित करत आहे. दमदार अ‍ॅक्शन, प्रभावी कथा आणि मजबूत कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट गेल्या सहा दिवसांत 180 कोटींचा आकडा पार करत बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवत आहे. रणवीर सिंग, सारा अली खान, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सध्या सर्वत्र चर्चेत असलेले अक्षय खन्ना यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या आहेत.

या स्टारकास्टसोबतच, एक छोटी पण जबरदस्त छाप पडलेली भूमिका म्हणजे अभिनेत्री सोम्या टंडनची. ‘भाभी जी घर पर है’ या सुपरहिट मालिकेतून घराघरात पोहोचलेली सोम्या टंडन ‘धुरंधर’मध्ये डाकू रहमानची (अक्षय खन्ना) पत्नी म्हणून दिसते. तिची भूमिका छोटी असली तरी स्क्रीनवर तिची उपस्थिती ठळकपणे जाणवते.

याच दरम्यान, मालिकेतील तिचा प्रसिद्ध सहकलाकार हप्पू सिंग (योगेश त्रिपाठी)ने सोम्याचा एक फोटो शेअर करत एक भन्नाट मीम पोस्ट केला आहे. आपल्या इंस्टाग्रामवर योगेशने सोम्यासोबतचा एक फोटो टाकत लिहिले— “या डाकूने गोरी मॅडमला एका झटक्यात दूर नेले. हम तो बस फोन ही करते रह गए.”  या कॅप्शनवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मजेशीर कमेंट्स करत हप्पू सिंग आणि सोम्याची जुनी केमिस्ट्री पुन्हा आठवली.भाभी जी घर पर है’मध्ये “गोरी मॅडम” म्हणून लोकप्रिय झालेल्या सोम्याने ‘धुरंधर’मध्ये तिच्या मर्यादित पण प्रभावी भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. अक्षय खन्नासोबत तिची केमिस्ट्री देखील चाहत्यांना आवडली.

लष्करी हेरगिरी आणि पाकिस्तानी माफियाच्या जगात डोकावणारा ‘धुरंधर’ (Dhurandhar)प्रेक्षकांना चांगलाच भिडला आहे. एक भारतीय गुप्तहेर पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कची गाठ कशी सोडवतो, यावर आधारित कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. चित्रपटाच्या यशानंतर आता त्याच्या सिक्वेलची उत्सुकता वाढली असून, पुढील भाग 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक, कलाकार आणि समीक्षक—सर्वांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असल्याने ‘धुरंधर’ या वर्षातील सर्वात मोठ्या हिटपैकी एक ठरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

2025 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला ‘धुरंधर’,सहा दिवसांत 180 कोटींची कमाई, हृतिक रोशनही झाला चित्रपटाचा चाहता

हे देखील वाचा