Tuesday, July 9, 2024

मृत्यूच्या वेळी गर्भवती होती बिग बींची ‘ही’ अभिनेत्री; चित्रपटात काम करण्यासाठी सोडली होती एमबीबीएसची पदवी

‘सूर्यवंशम’ हा चित्रपट नेहमीच टीव्हीवर पाहायला मिळतो. याबद्दल अनेक प्रकारचे विनोद आणि मीम्सदेखील बनवले जातात. हा चित्रपट टीव्हीवर इतक्या वेळा आला आहे की, यातील प्रत्येक पात्रांचे नाव आणि चित्रपटाचे सीन प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ झाले आहेत. भलेही हा चित्रपट पडद्यावर यशस्वी झाला नाही, पण प्रेक्षकांनी टीव्हीवर याला खूप चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाची अभिनेत्री सौंदर्या हिलाही प्रेक्षकांनी पसंत केले. एका अपघातात सौंदर्याचे निधन झाले होते, ज्याने मनोरंजन जगाला जबरदस्त धक्का दिला. आज आपण तिच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊयात.

दक्षिण भारतीय अभिनेत्री सौंदर्याचा जन्म १८ जुलै, १९७२ रोजी कर्नाटकात झाला होता. तिचे वडील कन्नड इंडस्ट्रीतील लेखक-निर्माते होते. सौंदर्या एमबीबीएस पदवी घेत होती. तिला अभिनेत्री होण्याची खूप इच्छा होती, यामुळे तिने शिक्षण सोडले आणि करमणुकीच्या जगात आली.

सौंदर्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘गंधर्व’ चित्रपटाने केली. यानंतर ती अनेक तेलुगु चित्रपटांमध्ये दिसली. सौंदर्याने तिच्या चेहऱ्यावरील साधेपणाने आणि डोळ्यातील निरागसपणाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. दक्षिणेचा सुपरस्टार व्यंकटेशने सौंदर्याचे ‘परिपूर्ण अभिनेत्री’ म्हणून वर्णन केले होते.

सौंदर्याने सुमारे १०० तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले आहे. रजनीकांत आणि कमल हासन यांसारख्या दक्षिणेतील दिग्गज कलाकारांसोबतही तिने काम केले आहे. मात्र, अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सूर्यवंशम’ या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने तिला बॉलिवूडमध्ये एक खास ओळख मिळाली.

सौंदर्या चित्रपटांमध्ये हिट ठरली आणि काही काळानंतर ती राजकारणातही आली. तिने भाजपामध्ये प्रवेश केला. २००४ मध्ये लोकसभा निवडणुका जोरात सुरू असताना, विधानसभा निवडणुकाही घेण्यात आल्या. आंध्रप्रदेशातही निवडणुकीचे वातावरण होते. त्याचवेळी करीमनगर मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते विद्या सागर निवडणूक लढवत होते.

राव यांची खासदारकी आणि टीडीपी नेत्यांच्या विधानसभेसाठी मतांची मागणी करायला सौंदर्याही येणार होती. त्यावेळी ती बेंगळुरूमध्ये होती. १७ एप्रिल रोजी, तिचे विमान जक्कूर एयरोड्रसहून निघाले. तिच्यासोबत तिचा धाकटा भाऊ आणि तेलुगु चित्रपटांचे निर्माते अमरनाथही होते. विमान चालू असताना अचानक मोठा स्फोट झाला आणि विमान कोसळले. या अपघातात सौंदर्याचा मृत्यू झाला आणि तिच्याबरोबर तिचा भाऊ आणि निर्मातेही जग सोडून गेले. यानंतर जेव्हा ती आई होणार असल्याचे समजले, तेव्हा प्रत्येकांना खूपच धक्का बसला. सौंदर्या अचानक जग सोडून गेली. तिच्या निधनाने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्किट होणं सोप्पं नव्हतं भाऊ! चौदाव्या वर्षीच आई-बापाचे छत्र हरपलेल्या अर्शद पुढे असा झाला सुपरस्टार

-‘तुम्ही तुमचे काम करा’, फिरोज खान यांचे शब्द ऐकताच अभिनेते राजकुमार झाले होते रागाने लालेलाल, दिली होती ‘ही’ धमकी

-भारीच! चौदा वर्षांपुर्वी अभिषेकबरोबर झालेल्या लग्नात ऐश्वर्या रायने घातली होती एवढ्या लाखांची साडी

-काय सांगता! करन-अर्जुनमधील शाहरुखची प्रेयसी झालीय साध्वी, बॉलीवूडला ठोकलाय कायमचा राम-राम

हे देखील वाचा