Sunday, August 3, 2025
Home मराठी गोड बातमी! सावनी रवींद्रने आपल्या चिमुकलीचे ठेवले ‘हे’ नाव; फोटो शेअर करत सांगितला नावाचा अर्थ

गोड बातमी! सावनी रवींद्रने आपल्या चिमुकलीचे ठेवले ‘हे’ नाव; फोटो शेअर करत सांगितला नावाचा अर्थ

संगीत क्षेत्रात आपल्या आवाजाने नेहमीच सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रवींद्र. तिने अनेक प्रकारची गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचा जबरदस्त चाहतावर्ग तयार झाला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी सावनीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. ती म्हणजे सावनी आई झाली आहे. सावनीला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. यानंतर आता तिने तिच्या मुलीच्या बारशाचे फोटो शेअर केले आहेत.

सावनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मुलीच्या बारशाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने तिच्या मुलीचे नाव सांगितले आहे. सावनीने तिच्या मुलीचे नाव ‘शार्वी’ असे ठेवले आहे. सावनीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचा पती डॉक्टर आशिष धांडे दिसत आहे. सावनीने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिच्या पतीने देखील काळ्या रंगाचा कुर्ता घातलेला आहे. तसेच त्यांनी आजूबाजूला डेकोरेशन केलेले आहे. त्यांच्या मागे शार्वी असे लिहिले आहे. (Savaniee Ravindrra share a photo and tell her daughter’s name)

हे फोटो शेअर करून तिले लिहिले आहे की, “आजपासून आमच्या बाळाचे नाव शार्वी. पार्वती देवी आणि दुर्गा देवीचे हे नाव आहे. तसेच या नावाचा आणखी एक अर्थ म्हणजे दिव्य-दैवी. आमच्या बाळाच्या पाठीशी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव राहूदेत.”

सावनीने ती प्रेग्नेंट असल्याची बातमी देखील सोशल मीडियावर तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर करून दिली होती. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आता तिने तिच्या मुलीचे नाव सांगितल्यावर अनेकजण तिला या पोस्टवर कमेंट करून शुभेच्छा देत आहेत.

सावनी ही संगीत क्षेत्रातील एक आघाडीची गायिका आहे. तिने राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवला आहे. ती नेहमीच संगीत क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करत असते. तिने मराठीसह हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली आणि कोकणी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तिचे केवळ भारतातच नव्हे, तर जगभर नाव पसरले आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

-अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबाची हजेरी, कपूर सिस्टर्सने केली धमाल

-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक

हे देखील वाचा