Thursday, July 24, 2025
Home मराठी ‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट

‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट

‘काहे दिया परदेस’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. सोबतच मालिकेत अभिनय करून अभिनेत्री सायली संजीव देखील घराघरात पोहोचली. तिच्या निरागस अभिनयाचे लाखो चाहते आहेत. तसेच अभिनेत्री या दिवसात सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाली आहे. बऱ्याचदा तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यांना चाहत्यांकडून खूप प्रेमही मिळते. अशातच सायलीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या जोरदार चर्चेत आहे.

सायलीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सायलीने अत्यंत स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे. तुम्ही पाहू शकता की, सायलीने गुलाबी रंगाचा टॉप परिधान केला आहे. हा टॉप पुढच्या बाजूने पाहिला, तर तो क्रॉप टॉप दिसतो. मात्र, मागच्या बाजूने तो लाँग टॉप आहे. तसेच तिने निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. बलून स्लीव्हस टॉपमध्ये सायली खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा वेगळा लूक खूपच आवडला आहे. (sayali sanjeev’s share her stylish photo on social media)

सायलीचे अनेक चाहते तसेच अनेक कलाकार देखील तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोवर सुबोध भावेने हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. अभिनेत्री आदिती द्रविड हिने या फोटोवर “पिंकी,” अशी कमेंट केली आहे, तर समिधा गुरु हिने “सुंदरा गं माझी,” अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक चाहते देखील कमेंट करून तिच्या नव्या लूकचे कौतूक करत आहेत.

सायलीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठी चॅनेलवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेत ‘गौरी’ची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिच्यासोबत ऋषी सक्सेना होता. या मालिकेतून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीही पाऊल ठेवले. तिने ‘पोलीस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहेत. सध्या ती कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत सुयश टिळक मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिचा अभिनय तिच्या चाहत्यांना आवडत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

हे देखील वाचा